मोदींनी मंत्रिमंडळातून काढलं; नाराज खासदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश

मोदींनी मंत्रिमंडळातून काढलं; नाराज खासदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश
Updated on
Summary

केंद्रीय मंत्रीमंडळात झालेल्या फेरबदलावेळी बाहेरचा रस्ता दाखवल्यानं नाराज झालेल्या भाजप खासदाराने ममता बॅनर्जींच्या पक्षात प्रवेश केला.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीमंडळात झालेल्या फेरबदलावेळी बाहेरचा रस्ता दाखवल्यानं नाराज झालेल्या भाजप खासदाराने ममता बॅनर्जींच्या पक्षात प्रवेश केला. भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी भाजपला रामराम केल्यानतंर त्यांच्या TMC प्रवेशाची औपचारिकता बाकी होती ती पूर्ण झाली. टीएमसीचे राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो हे केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर नाराज होते. त्यानंतरच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. बाबुल सुप्रियो यांच्या टीएमसी प्रवेशाना पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेने खळबळ उडाली होती. त्यानंतर बाबुल सुप्रियो म्हणाले होते की,'भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली मात्र त्यांनी पुढच्या रणनितीबद्दल काहीच निर्णय़ घेतल्याचं स्पष्ट केलं नाही. भविष्यात मी काय करणार हे येणारी वेळच सांगेल.' दरम्यान, त्यांचा राजीनाम्याचा हा निर्णय त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने आणि पश्चिम बंगालच्या भाजप नेत्यासोबत असलेला वाद यामुळे होता असे संकेत त्यांनी दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()