Jet Airways ED Action: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल अन् कुटुंबीय गोत्यात! EDनं जप्त केली 538 कोटींची मालमत्ता

कॅनरा बँकेचं कर्ज जेट एअरवेजनं भलत्याच कामासाठी वापरलं होतं.
Naresh Goyal
Naresh Goyal
Updated on

नवी दिल्ली : जेट एअरवेज इंडिया लिमिटेड या विमान कंपनीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीनं मोठी कारवाई केली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि कुटुंबीयांची तब्बल ५३८.०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. (Founder of Jet Airways Naresh Goyal and family in trouble 538 crore property seized by ED)

कुठल्या मालमत्ता जप्त?

ईडीच्या निवेदनानुसार, ज्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १७ फ्लॅट्स, बंगले आणि व्यावसायिक अस्थापनांचा समावेश आहे. या मालमत्ता विविध लोकांच्या आणि कंपन्यांच्या नावावर विकत घेण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

ज्यामध्ये जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल त्यांची पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांचा समावेश आहे. तसेच लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमध्ये असलेल्या जेटएअर प्रायव्हेट लिमिटेड, जेट एन्टरप्राईझेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या नावांचाही यात समावेश आहे. (Marathi Tajya Batmya)

Naresh Goyal
Manoj Jarange: "फडणवीसांनी इथं चर्चेसाठी यावं, माझे मराठे तुम्हाला संरक्षण देतील"; जरांगेंचं आवाहन

गोयल यांना अटक

नरेश गोयल यांना आर्थिक घोटाळा प्रकरणात सप्टेंबर महिन्यात अटक झाली होती. त्यानंतर काल मंगळवारी त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाली. त्यानंतर त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला वेग आला आहे. (Latest Marathi News)

Naresh Goyal
Manipur Violence: मैतेई अन् कुकी समाजाला थेट आवाहन; हिंसाचारावर राजनाथ सिंहांनी काढला तोडगा!

काय आहे प्रकरण?

कॅनरा बँकेनं नोव्हेंबर २०२२ मध्ये तक्रार दाखल केली होती की, यात आरोप करण्यात आला होता की, जेट एअरवेजला ऑपरेशनल कामासाठी जे कर्ज बँकेनं दिलं होतं, ते वैयक्तीक खर्चासाठी वापरण्यात आलं आहे. सीबीआयकडं या तक्रारीवरुन पहिल्यांदा गुन्हा दाखल केला. त्यावरुन आर्थिक घोटाळा असल्यानं ईडीनं देखील यासंदर्भात खटला दाखल केला.

Naresh Goyal
Maratha Reservation : सरकारला किती अन् कशासाठी वेळ हवा? सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेचा सवाल

बँकेनं कशाच्या आधारे तक्रार दिली?

सन २०११-२०१९ थर्ड पार्टी ऑडिट कंपनीनं केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटच्या आधारे कॅनरा बँकेनं तक्रार दाखल केली होती. यानंतर २०१९ मध्ये कॅनरा बँकेचं हे लोन एनपीए घोषित करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.