Viral Video: स्मशानभूमीची भिंत कोसळल्याने मुलींसह चौघांचा मृत्यू, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

Gurgaon, Haryana: खुशबू ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. लग्नानंतर चार वर्षे उपचार घेतल्यानंतर आणि अनेक मंदिरात प्रार्थना केल्यानंतर खुशबूचा जन्म झाला होता.
Four including a girl died after wall of cremation ground collapsed in Gurugram.
Four including a girl died after wall of cremation ground collapsed in Gurugram.Esakal
Updated on

हरियाणाच्या गुडगावमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री गुडगावमधील मदनपुरी स्मशानभूमीची भिंत अचानक कोसळली. ही भिंत कोसळली तेव्हा तेथे लहान मुले आणि काही लोकही उपस्थित होते.

भिंत कोसळल्याने सुमारे 7 ते 8 लोक गाडले गेले. ज्यामध्ये 2 मुलींसह 4 जणांचा मृत्यू झाला. उर्वरित पीडितांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांसह मदत आणि बचाव कार्य सुरू केले. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Four including a girl died after wall of cremation ground collapsed in Gurugram)

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात काही लोक भिंतीलगत रस्त्यावर खुर्च्यांवर बसले होते आणि अचानक भिंत कोसळली आणि ते त्याखाली गाडले गेले.

भिंत पडताना पाहून ते त्यांनी खुर्च्यांवरून उठून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आले. यानंतर आजूबाजूचे लोक ढिगारा हटवताना दिसत आहेत.

Four including a girl died after wall of cremation ground collapsed in Gurugram.
Lok Sabha Election 2024 : ''काँग्रेस सत्तेत आल्यास सॅलरी दुप्पट करणार'', राहुल गांधींनी दिलं आश्वासन

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कोसळलेल्या मदनपुरी स्मशानभूमीच्या भिंतीसमोर हजारो टन लाकूड ठेवण्यात आले होते. या लाकडांच्या वजनामुळे ही भिंत वाकडी झाली होती, त्यासाठी लोकांनी स्मशानभूमी प्रशासनाला अनेक वेळा दुरुस्तीची मागणी केली होती, पण काहीही कारवाई झाली नाही.

शनिवारी सायंकाळी ६.२० वाजेच्या सुमारास येथे काही लोक बसले असताना अचानक भिंत कोसळल्याने हे लोक त्याखाली गाडले गेले.

दरम्यान, तेथून जात असलेली सात वर्षांची तान्या आणि दहा वर्षांची खुशबू या दोघीही जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घरात शोकाकुल वातावरण आहे.

Four including a girl died after wall of cremation ground collapsed in Gurugram.
मतदान झालं अन् पुढच्याच दिवशी भाजप उमेदवाराचा मृत्यू; आता पुढे काय होईल? जाणून घ्या

ही घटना ज्या स्मशानभूमीला लागूनच अर्जुन नगर पोलीस चौकीची भिंत आहे. आवाज ऐकून पोलीसही चौकीतून बाहेर आले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले.

सध्या पोलीस याप्रकरणी काहीही बोलले नाहीत. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे चौकी प्रभारींनी सांगितले.

येथे राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, खुशबू ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. लग्नानंतर चार वर्षे उपचार घेतल्यानंतर आणि अनेक मंदिरात प्रार्थना केल्यानंतर खुशबूचा जन्म झाला आणि आता खुशबूच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर तान्या ही तीन भावांची एकुलती एक बहीण असल्याचेही सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.