नवी दिल्ली : यावर्षी जानेवारी महिन्यात नवी दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकानं लडाखमधील चार विद्यार्थ्यांना गुरुवारी अटक केली. कारगीलमधून ही अटकेची कारवाई झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना दिल्लीत आणलं असून इथं त्यांची चौकशी केली जात आहे. (Four Ladakh students held over blast near Israel Embassy in Delhi)
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, "दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने लडाखच्या कारगील जिल्ह्यातून चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. या विद्यार्थ्यांना गुरुवारी चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आलं. इस्रायल दुतावासाबाहेर स्फोटाचा कट रचल्याप्रकरणी या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पण हे विद्यार्थी नक्की कोण आहेत? त्यांची नाव काय आहेत? हे दिल्ली पोलिसांनी अद्याप उघड केलेलं नाही, तसेच कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सीसीटीव्हीत दिसून आले आरोपी
इस्रायली दुतावासाबाहेर स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास पथक (NIA) आणि दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम करत आहे. एनआयएच्या टीमला सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दोन आरोपी दिसून आल्याने मोठं यश मिळालं होतं. या आरोपींना पकडून देण्यासाठी १० लाखांचं बक्षिस होतं. एजन्सीच्या हाती आलेल्या फुटेजमध्ये एक व्यक्ती हातात फाईल आणि दुसरी व्यक्ती बॅग घेतलेलं दिसून आली. यानंतर ते रिक्षानं जामियानगरमध्ये अब्दुल कलाम रोडवर पोहोचले. त्यानंतर इथं बॉम्ब ठेऊन ते रिक्षानेचं अकबर रोडच्या दिशेने गेले. त्यानंतर दोघांनीही आपले जॅकेट काढून टाकले कारण कोणी त्यांना ओळखू शकणार नाही.
कुठून आली स्फोटकं?
सुत्रांच्या माहितीनुसार, चौकशीत उघड झालं की, स्फोटामध्ये PETNचा वापर झाला आहे. हे मिलिट्री ग्रेड स्फोटकं आहेत. त्यामुळे ही स्फोटकं सहज उपलब्ध होत नाही. पण अल-कायदा सारख्या मोठ्या दहशतवादी संघटना या स्फोटकांचा वापर करतात. पण ही स्फोटकं दिल्लीत कशी आली याचा छडा लावण्याचा प्रयत्न एनआयएकडून सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.