Muslim Reservation : मुस्लिमांचं चार टक्के आरक्षण का रद्द केलं? अमित शहांनी सांगितलं 'कारण'

कर्नाटकात विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election 2023) तोंडावर आल्या आहेत.
Muslim Reservation Amit Shah
Muslim Reservation Amit Shahesakal
Updated on
Summary

कर्नाटकातील भाजप सरकारनं गेल्या महिन्यात अल्पसंख्याकांचे चार टक्के आरक्षण रद्द केलं होतं.

नवी दिल्ली : कर्नाटकात विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election 2023) तोंडावर आल्या आहेत. 10 मे रोजी मतदान होणार आहे. अशा स्थितीत विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही आज (शनिवार) काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसनं असंवैधानिक पद्धतीनं मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिलं होतं. मात्र, भाजपनं ही प्रथा संपवली, असं शहा म्हणाले.

एका वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले, 'भाजपनं पात्र व्यक्तींना आरक्षणाचा अधिकार दिला आहे. सामाजिक दृष्टिकोनातून न्यायाचा विचार केला तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं (Congress) असंवैधानिकपणे 4 टक्के मुस्लिम आरक्षण दिलं होतं. हे असंवैधानिक आहे. कारण, आपली राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला परवानगी देत ​​नाही.'

Muslim Reservation Amit Shah
DK Shivakumar : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांवर लाच घेतल्याचा आरोप, आयोगाकडं तक्रार

शहा पुढं म्हणाले, भाजप सरकारनं मुस्लिमांचं 4 टक्के आरक्षण (Muslim Reservation) रद्द केलं आहे. सरकारनं एससी, एसटी, वोक्कलिगा आणि लिंगायत यांच्या आरक्षणात वाढ केली आहे. आम्ही पात्र लोकांना अधिकार दिले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Muslim Reservation Amit Shah
Ramadan Eid : जीव देईन, पण देशाचे तुकडे कधीच होऊ देणार नाही; ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

कर्नाटकातील भाजप सरकारनं गेल्या महिन्यात अल्पसंख्याकांचे चार टक्के आरक्षण रद्द केलं होतं. दोन प्रमुख समुदायांच्या कोट्यात हे आरक्षण समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. या निर्णयानुसार, ओबीसी प्रवर्गाच्या 2B वर्गीकरणांतर्गत मुस्लिमांना दिलेलं 4 टक्के आरक्षण आता दोन समान भागांमध्ये विभागलं जाईल आणि वोक्कालिगा आणि लिंगायतांच्या कोट्यात जोडलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.