Fouzia Khan : स्मार्ट सिटींची स्थिती खराब ; फौजिया खान,पुण्यात २६ तर नागपुरात १५ टक्केच कामे पूर्ण

राज्यातील स्मार्ट सिटींची अवस्था चिंताजनक असून महाराष्ट्रातील आठ पैकी सात स्मार्ट सिटींची कामे पूर्ण झालेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार डॉ. फौजिया खान यांनी आज राज्यसभेत केला.
Fouzia Khan
Fouzia Khansakal
Updated on

नवी दिल्ली : राज्यातील स्मार्ट सिटींची अवस्था चिंताजनक असून महाराष्ट्रातील आठ पैकी सात स्मार्ट सिटींची कामे पूर्ण झालेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार डॉ. फौजिया खान यांनी आज राज्यसभेत केला. अर्थसंकल्पातील गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या मागण्यांवर बोलताना डॉ. फौजिया खान म्हणाल्या, ‘‘केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना सुरू केल्या. परंतु या योजनांची अंमलबजावणी मात्र करण्यात केंद्र सरकारला यश आले नाही.

यामुळे मोठ्या शहरातील पायाभूत सुविधा कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. देशातील १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची संख्या ५३ आहे. अर्थसंकल्पात सुद्धा मोठ्या शहरांना निधी देण्यात पाचव्या प्राधान्य क्रमाकांवर आहे. यामुळे महानगरातील गृहनिर्माण सुविधा, आरोग्य सुविधा, मलःनिसारण सुविधा, स्वच्छतेच्या सुविधांचा बोजवारा उडत आहे.

महाराष्ट्रातील एकूण आठ शहरे स्मार्ट सिटीमध्ये घेतली आहे. परंतु या शहरातील कामे मात्र पूर्ण झालेली नाही. पुणे शहरात या योजनेअंतर्गत केवळ २६ टक्के कामे झाली आहेत. नागपूरमध्ये १५ टक्के तर कल्याणमध्ये केवळ १० टक्के कामे झाली आहेत. यावरून स्मार्ट सिटी योजना ही अपयशी योजना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपुरातील मेट्रो रेल्वे योजना ही अशीच अपयशी योजना आहे. या मेट्रोत प्रवाशी नसतात. जनतेचा पैसा यात वाया गेला आहे. दुसरीकडे कॅगने नागपूर मेट्रोमध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. अनेकांना कागदपत्रांची पूर्तता न करता निविदा मंजूर केल्याचे दिसून आल्याचा आरोप डॉ. फौजिया खान यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.