Foxconn CEO Young Liu: फॉक्सकॉनच्या सीईओंचा पद्मभूषणनं गौरव! भारतात चीप निर्मितीत दिलं मोठं योगदान

यंग लियू यांना भारत सरकारच्यावतीनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
Young Liu
Young Liu
Updated on

नवी दिल्ली : तैवानचा मोठा उद्योगसमूह असलेल्या हॉन हाई टेक्नॉलॉजी ग्रुपचे (फॉक्सकॉन) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चेअरमन यंग लियू यांना गुरुवारी भारत सरकारच्यावतीनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक चीप निर्मिती कंपनी तसेच सायन्स आणि टेक्नॉलॉजी सुविधा पुरवणारी कंपनी आहे. (Foxconn CEO Young Liu honored with Padma Bhushan made a great contribution to chip production in India)

Young Liu
Viral Video: PM मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत दुकानात चहा घेतला अन् केलं UPI पेमेंट

फॉक्सकॉनच्या अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार, लियू हे एक मान्यताप्राप्त उद्योगपती आणि प्रवर्तक आहेत. त्यांच्याकडं उद्योगजगतात काम करण्याचा चार दशकांचा अनुभव आहे. त्यांनी तीन कंपन्यांची स्थापना केली आहे. (Latest Marathi News)

१९८८ मध्ये कॉम्प्युटरची एक मदरबोर्ड कंपनी ज्याला यंग मायक्रो सिस्टिमची स्थापना केली. १९९५ मध्ये त्यांनी एक नॉर्थब्रीज आणि साऊथब्रीज आयसी डिझाईन कंपनी बनवली. जी पीसी चिपसेटवर आधारीत आहे. याशिवाय त्यांनी १९९७ मध्ये आयटीई टेक आणि एक एडीएलएस आयसी डिझाईन कंपनी आयटीएक्सची पायाभरणी केली होती.

Young Liu
PM Modi greeting: PM मोदींकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा अन पद्म पुरस्कार्थींचं अभिनंदन; म्हणाले, जनतेला...

लियू यांनी १९८६ यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये एमएसची डिग्री घेतली आणि १९७८ मध्ये तैवानच्या नॅशनल चियाओ तुंग विद्यापीठातून इलेक्ट्रोफिजिक्समध्ये बीएसची डिग्री घेतली. फॉक्सकॉन कंपनीनं कोविड महामारीनंतर चीनमधून आपली गुंतवणूक विक्रेंद्रित करत भारतात आपल्या गुंतवणुकीचा वेगानं विस्तार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.