देश
Foxconn Company : कर्नाटकात तब्बल 22 हजार कोटींचा प्रकल्प; 'फॉक्सकॉन' 40 हजार थेट नोकऱ्या देणार
Foxconn Company : कंपनीने कर्नाटक सरकारसह राज्यात ५०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करण्यासाठी करार पत्रावर स्वाक्षरी केली होती.
Summary
‘फॉक्सकॉन’ला आम्ही पाणी, वीज आणि रस्त्यांपासून कायदेशीर मदतीपर्यंत सर्व काही देऊ, असे लिऊ यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
बंगळूर : तैवानी उत्पादक ‘फॉक्सकॉन’ने (Foxconn Company) कर्नाटकमध्ये २२ हजार कोटींचा प्रकल्प दोड्डबळ्ळापूरजवळ उभारला आहे. त्यातून राज्यात ४० हजार थेट नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ‘फॉक्सकॉन’चे प्रमुख यंग लिऊ (Young Liu) यांनी सांगितले की, कर्नाटकातील युनिट, चीनच्या युनिटनंतर फॉक्सकॉनचा दुसरा सर्वात मोठा प्लांट बनण्याची अपेक्षा आहे.