यूपीच्या लेडी सिंघमची फसवणूक...IRS अधिकारी असल्याचं सांगून महिला पोलीस अधिकाऱ्याशी केलं लग्न!

उत्तर प्रदेशच्या पोलीस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकूर यांची मेट्रोमोनियल साईटवरुन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यासोबत एका खोट्या आयआरएस अधिकाऱ्याने विवाह करुन लाखो रुपयांना गंडवलं आहे. (fake IRS officer married to female police officer shrestha thakur )
fake IRS officer married to female police officer shrestha thakur
fake IRS officer married to female police officer shrestha thakur
Updated on

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या पोलीस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकूर यांची मेट्रोमोनियल साईटवरुन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यासोबत एका खोट्या आयआरएस अधिकाऱ्याने विवाह करुन लाखो रुपयांना गंडवलं आहे. लग्नानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला या फसवणुकीची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरोपीपासून घटस्फोट घेतला आहे. पण, तो पत्नीचे नाव वापरुन अनेकांची फसवणूक करत होता. त्यानंतर श्रेष्ठा ठाकूर यांनी तक्रार दाखल केली आहे.(Fraud with Lady Singham of UP fake IRS officer married to female police officer shrestha thakur)

माहितीनुसार, श्रेष्ठा ठाकूर या २०१२ बॅचच्या राज्य पोलीस दलातील अधिकारी (PPS Officer) आहेत. सध्या त्या यूपीच्या शामलीमध्ये तैनात आहेत. श्रेष्ठा ठाकूर या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी तक्रारीत म्हटलंय की, २०१८ मध्ये त्यांचे लग्न रोहित नावाच्या एका व्यक्तीशी झाले होते. त्यांची भेट एका मेट्रोमोनियल साईटवर झाली होती. रोहितने स्वत:ला २००८ बँचचा आयआरएस अधिकारी सांगितलं होतं. तसेच सध्या उपायुक्त म्हणून रांची येथे तैनात असल्याचं सांगितलं होतं.

fake IRS officer married to female police officer shrestha thakur
Pune Crime News : शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रूग्णालयातून फरार; पोलीस दलात खळबळ

विशेष म्हणजे श्रेष्ठा ठाकूर यांच्या घरच्यांनी आरोपी रोहित याच्या सत्यतेबाबत पडताळणी केली होती. २००८ च्या बॅचला रोहित राज नावाचा एक अधिकारी निवडला गेला होता. तसेच तो उपायुक्त म्हणून रांची येथे कामाला देखील होता. खोटं नाव धारण करुन आरोपीने फसवणूक केली होती. त्यानंतर श्रेष्ठा आणि रोहित यांचे लग्न झाले. पण, लग्नानंतर श्रेष्ठा यांना खरी गोष्ट कळली. पण, बदनामी होईल म्हणून त्यांनी आधी ही गोष्ट बाहेर येऊ दिली नाही.

रोहित पुढेही अनेक गोष्टींमध्ये फसवणूक करु लागला होता. त्याला कंटाळून अखेर श्रेष्ठा ठाकूर यांनी घटस्फोट घेतला. पण, तरीही रोहित विविध प्रकारे महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव सांगून लोकांची फसवणूक करु लागला. त्यांच्याकडून पैसे उकळू लागला. या सगळ्यामुळे हैराण झालेल्या श्रेष्ठा ठाकूर यांनी अखेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्याकडून लाखो रुपये घेतल्याचं सांगितलं जातंय.

fake IRS officer married to female police officer shrestha thakur
Pune Crime News : शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रूग्णालयातून फरार; पोलीस दलात खळबळ

श्रेष्ठा ठाकूर यांची पोलीस दलात येण्याची स्टोरी आहे खास

महिला पोलीस अधिकारी श्रेष्ठा ठाकूर यांची पोलीस सेवेमध्ये येण्याची स्टोरी खूप रंजक आहे. कानपूरच्या एका कॉलेजमध्ये त्या शिक्षण घ्यायच्या. त्यावेळी काही टपोरी मुलं मुलींची वारंवार छेड काढायचे. यासंदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर त्यांनी ठरवलं की स्वत:च अधिकारी व्हायचं आणि अशा लोकांना धडा शिकवायचा. त्यांनी जिद्दीने अभ्यास केला आणि २००८ मध्ये त्या राज्य पोलीस दलात अधिकारी झाल्या. त्यांना उत्तर प्रदेशात चर्चित अधिकारी म्हणून ओळखलं जातं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.