बंगळूर : राज्यातील महिलांसाठी सरकारी बसेसमध्ये (Government Bus) मोफत प्रवासाची योजना असणाऱ्या ‘शक्ती’ या पाच हमी योजनांपैकी (Shakti Yojana Karnataka) पहिल्या योजनेची सुरुवात बंगळुरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) करतील.
‘शक्ती’ योजनेअंतर्गत राज्याच्या सीमेपासून 20 किलोमीटर आतपर्यंत महिला राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास (Free Bus Travel) करू शकतात, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले. सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासमवेत रविवारी (ता. ११) विधानसौध येथून या योजनेचा प्रारंभ करू.
आम्ही पाचपैकी एक हमी योजनेची विधानसौध येथे आज सकाळी ११ वाजता सुरूवात करत आहोत. सर्व महिलांना एसी आणि व्होल्वो बसेस व्यतिरिक्त इतर एक्स्प्रेस बससेवांसह इतर सर्व (सरकारी मालकीच्या) महामंडळाच्या बसमधून राज्यामध्ये मोफत प्रवास करण्याचा अधिकार असेल, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना सांगितले.
‘महिलांना (Women) आंतरराज्य बसने प्रवास करायचा असेल, तर ही सेवा मोफत नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जर एखाद्या महिलेला तिरुपतीला जायचे असेल, तर ती मोफत प्रवास करू शकत नाही. ती मुळबागलपर्यंत (आंध्रप्रदेशच्या सीमेवरील कोलार जिल्ह्यापर्यंत) जाऊ शकते. आणि त्यानंतर ते मोफत उपलब्ध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, शेजारच्या राज्यांमध्ये २० किमीपर्यंत प्रवास करणाऱ्यांना शुल्क आकारले जाणार नाही. उदाहरणार्थ, बळ्ळारी ते आंध्रप्रदेशात २० किमीपर्यंत महिला विनामूल्य जाऊ शकतात, असे सिद्धरामय्या म्हणाले.
इतर चार हमी योजनांच्या सुरुवात करण्याबद्दल स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, घरगुती ग्राहकांना २०० युनिट वीज मोफत देणारी ‘गृहज्योती’ एक जुलैपासून गुलबर्गा येथून सुरू केली जाईल. त्याच दिवशी दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना १० किलो मोफत तांदूळ किंवा अन्नधान्य देणारी ‘अन्नभाग्य’ योजना म्हैसूरमधून सुरू केली जाईल.
‘गृहलक्ष्मी’ योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, १६ ऑगस्ट रोजी बेळगावातून ही योजना सुरू केली जाईल. आम्ही १५ जुलैपासून ‘गृहलक्ष्मी’ योजनेसाठी अर्ज मागवू. ज्यावर १५ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर आम्ही १६ ऑगस्टपासून बेळगावमध्ये ही योजना सुरू करू, असे ते म्हणाले.
पदवीधरांना तीन हजार रुपये आणि पदविकाधारकांना १५०० रुपये बेरोजगारी भत्ता देणाऱ्या ‘युवानिधी’ योजनेबद्दल सिद्धरामय्या म्हणाले की, २०२२-२३ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पदवीधर आणि पदविकाधारकांना २४ महिन्यांसाठी भत्ता मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.