Gurbani Free Telecast: 'गुरबानी'वरून पंजाब मध्ये पेटला वाद, थेट प्रक्षेपण सोपं का नाही?

आप सरकारच्या या निर्णयाविरोधात अकाली दल, भाजप आणि काँग्रेसनेही आवाज उठवला आहे.
Gurbani Free Telecast
Gurbani Free TelecasteSakal
Updated on

पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान यांनी मंगळवारी विधानसभेत अमृतसर येथील हरमंदिर साहिब येथून मोफत गुरुबाणी प्रसारित करण्याचा प्रस्ताव आणल्याची माहिती दिली आहे. यानंतर यावरून वाद सुरू झाला आहे. मान यांच्या या निर्णयावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) नाराजी व्यक्त केली असून, सरकार अशा प्रकारे धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

पंजाबमधील मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारच्या या निर्णयाविरोधात अकाली दल, भाजप आणि काँग्रेसनेही आवाज उठवला आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मोफत गुरबानीसाठी शीख गुरुद्वारा कायदा 1925 मध्ये सुधारणा करण्याबाबत मान सरकार बोलत असले तरी या निर्णयाची अंमलबजावणी करणे इतके सोपे नाही. पण हरमंदिर साहिबमधून मोफत गुरबानी प्रसारित करणे सोपे का नाही?

Gurbani Free Telecast
Bastille Day: अभिमानास्पद! 'बॅस्टिल डे' संचलनात झळकणार नगरचा वीर; अमन जगताप करणार पंजाब रेजिमेंटचे नेतृत्व

1998 पासून केली जाते प्रसारित

गुरबानी 1998 पासून हरमंदिर साहिबमधून प्रसारित केली जात आहे. 2007 पासून बादल कुटुंबाच्या मालकीच्या पीटीसी नेटवर्कला ते प्रसारित करण्याचा अधिकार आहे. पीटीसी नेटवर्कबद्दल बोलायचं तर ते सुवर्ण मंदिरातून प्रसारणासाठी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीला (SGPC) दरवर्षी 2 कोटी रुपये देते.

PTC नेटवर्कचं म्हणणं आहे की, जगभरातील SGPC चे कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसारित करते, ज्यामध्ये ते कव्हरेज आणि टेलिकास्टवर एकूण 10 ते 12 कोटी रुपये खर्च करते. SGPC आणि PTC नेटवर्कचा करार जुलै 2023 मध्ये संपतोय. मान सरकार पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करू इच्छित नाही. त्याऐवजी, ज्या चॅनेलला पवित्र गुरबानी मोफत प्रसारित करायची आहे, ती परवानगी देण्याच्या बाजूने आहे.

Gurbani Free Telecast
Punjab Mail Anniversary : ‘पंजाब मेल’ला 111 वर्षे पूर्ण

विनामूल्य प्रसारित करणं सोपं का नाही?

गुरबानी हा गुरुद्वारांमध्ये गायली जाते. शिरोमणी प्रबंध समिती (SGPC) आणि अनेक कायदेतज्ज्ञांसह विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की शीख गुरुद्वारा कायदा 1925 मध्ये सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला आहे. पंजाब विधानसभेत याबाबत कोणतीही सुधारणा करता येणार नाही. एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदरसिंग धामी म्हणतात की, मान सरकारने आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात संभ्रम निर्माण करण्यापासून दूर राहिले पाहिजे.

गुरबानी प्रसारित करण्याचे नियम काय आहेत?

गुरबानी जगभरात वेगवेगळ्या टाइमझोनमध्ये प्रसारित केली जाते. त्याचे पावित्र्य राखणे ही टेलिकास्टरची जबाबदारी आहे. टेलिकास्टर्स गुरबानी दरम्यान कोणत्याही प्रकारची जाहिरात चालवू शकत नाहीत. गुरबानीच्या प्रसारणादरम्यान प्रायोजकत्वालाही परवानगी नाही.

द प्रिंटने पीटीसी चालवणाऱ्या जी-नेक्स्ट मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवींद्र नारायण यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, अनेक टीव्ही चॅनेल्सनी तसे करण्यास नकार दिल्याने चॅनलला सुवर्ण मंदिरातून गुरबानी प्रसारित करण्याचा अधिकार मिळाला.

Gurbani Free Telecast
Amit Shah : कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर; शहा यांची मुख्यमंत्री मान यांच्यावर टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.