पती French Fries खाऊ देत नाही म्हणून पत्नीने थेट केली क्रूरतेची केस; नवरा म्हणतो, "घरातील सर्व कामं मलाच लावायची"

French Fries Case Karnataka High Court: हा पोलिसांच्या अधिकाराचा वापर नसून महिलेच्या सांगण्यावरून सत्तेचा दुरुपयोग आहे. पतीला अमेरिकेला जाण्यापासून रोखणे हा तक्रारीचा उद्देश असल्याचे दिसून येते.
French Fries Case Karnataka High Court
French Fries Case Karnataka High CourtEsakal
Updated on

अलिकडील काळात देशभरातून पती-पत्नींच्या वादाच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना कर्नाटकातून आली आहे.

पत्नीला फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने पतीला जामीन मंजूर केला. याशिवाय न्यायालयाने या व्यक्तीविरुद्ध सुरू असलेला तपासही थांबवला आहे.

या प्रकरणाची सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना म्हणाले की, त्या व्यक्तीविरुद्धची तक्रार अत्यंत खालच्या दर्जाची आहे. पतीविरुद्ध कोणत्याही तपासाला परवानगी देणे हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखल्याचा आरोप

बंगळुरूतील बसवानगुडी, येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध दक्षिण महिला पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना महिलेने सांगितले की, बाळाला जन्म दिल्यानंतर तिला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. वजन वाढेल या भीतीने नवऱ्याने फ्रेंच फ्राईज, भात आणि मांसहारी पदार्थ खाण्यापासून रोखले.

पती म्हणतो, "घरातील कामं मलाच कारयला लावायची"

दरम्यान परदेशात नोकरीला असलेल्या पतीला आता न्यायालयाने अमेरिकेला जाण्याची परवणगी दिली आहे. ही परवागणी देताना न्यायालयाने पतीने पोलीस अधिकाऱ्यांना काही लागल्यास चौकशीत सहकार्य करण्याची अट घातली आहे.

यावेळी पतीच्या बाजून युक्तीवाद करणाऱ्या वकिलाने सांगितले की, या खटल्यातील महिला त्याच्या पतीसोबत मुलाल जन्म देण्यापूर्वी सहा वर्षे अमेरिकेत राहिली आहे. या दरम्यान ही महिला पतीलाच घरातील सर्व कामे करायला लावायची.

याचबरोबर ही महिला दिवसभर मोबाईलमध्ये व्यस्त असायची किंवा पाकिस्तानी टीव्ही शो पाहायची, असे पतीच्या वकिलाने पुढे म्हटले आहे.

French Fries Case Karnataka High Court
Delhi: १० वर्षीय मुलगा शाळेत चक्क पिस्तूल घेऊन पोहोचला, पोलिसांना पाचारण, नंतर जे घडलं त्यानं...

"कायद्याचा गैरवापर होईल..."

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश एम नागप्रसन्ना म्हणाले की, पतीविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या तपासाला परवानगी देणे कायद्याचा गैरवापर होईल. तक्रारीत घरगुती छळाखाली शिक्षा करण्यायोग्य कोणताही गुन्हा असल्याचे दिसत नाही.

एका किरकोळ कारणावरून पोलिसांनी पतीविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. हा पोलिसांच्या अधिकाराचा वापर नसून महिलेच्या सांगण्यावरून सत्तेचा दुरुपयोग आहे. पतीला अमेरिकेला जाण्यापासून रोखणे हा तक्रारीचा उद्देश असल्याचे दिसून येते.

French Fries Case Karnataka High Court
Unified Pension Scheme: NPS आणि OPS पेक्षा UPS कसा वेगळा आहे? कोणत्या स्कीममध्ये आहे जास्त फायदा? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.