Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी कोण असणार प्रमुख पाहुणे? जाणून घ्या

Republic Day 2024: २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे पंतप्रधान इम्यॅन्यूएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत.
Republic Day 2024
Republic Day 2024Esakal
Updated on

२६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गुरुवारी (२५ जानेवारी) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार असून ते राजस्थानची राजधानी जयपूर येथून दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील आमेर किल्ला, हवा महल आणि खगोलशास्त्रीय वेधशाळा 'जंतर मंतर'ला ते भेट देतील.

इमॅन्युएल मॅक्रॉन हे 26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे असतील. या भव्य कार्यक्रमात सहभागी होणारे ते फ्रान्सचे सहावे नेते असतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सुमारे सहा तास जयपूरमध्ये राहणार आहेत.

यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रोड शोमध्येही सहभागी होणार आहेत. हॉटेल ताज रामबाग पॅलेस येथे दोन्ही नेते भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंध आणि विविध भू-राजकीय घडामोडींवर व्यापक चर्चा करतील.

Republic Day 2024
National Voters Day : आज साजरा केला जातोय राष्ट्रीय मतदार दिन, मतदार म्हणून काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या

पंतप्रधान मोदी जयपूरमध्ये फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करतील

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5.30 वाजता इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत करतील आणि दोन्ही नेते जंतर मंतर, हवा महल आणि अल्बर्ट हॉल संग्रहालयासह शहरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विविध ठिकाणांना भेट देतील.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे विमान आज (गुरुवारी) दुपारी 2.30 वाजता जयपूर विमानतळावर उतरेल आणि आज रात्री 8.50 वाजता दिल्लीला रवाना होईल. रोड शो जंतरमंतर परिसरातून संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल, तर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात संध्याकाळी ७.१५ वाजता चर्चा सुरू होईल.

Republic Day 2024
Weather Update: कडाक्याच्या थंडीसोबत आता अवकाळी पावसाचीही शक्यता! वाचा हवामान विभागाचा अंदाज

प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे असतील

इमॅन्युएल मॅक्रॉन उद्या (शुक्रवारी) प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे ९५ ​​सदस्यीय मार्चिंग पथक आणि ३३ सदस्यीय बँड पथकही परेडमध्ये सहभागी होणार आहे. दोन राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच हवाई दलाचे एअरबस A330 मल्टी-रोल टँकर वाहतूक विमानही या समारंभात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या मेजवानीला इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत. उद्या (शुक्रवारी) संध्याकाळी ७.१० वाजता मुर्मू यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्याच रात्री 10.05 वाजता ते दिल्लीहून फ्रान्सला रवाना होतील.

Republic Day 2024
Nashik Crime : ISIS ला नाशिकमधून फंडिंग! संशयित ATS च्या ताब्यात; 7 दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.