अरुणाचल प्रदेश पोलिसांनी कलाकार कोन वाई सोन याच्या विरोधात ईटानगर येथे एफआयआर दाखल केला आहे. कोन वाई सोन याच्याविरोधात पशु क्रूरतेच्या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. कोन यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सार्वजनिक रित्या एका कोंबड्याचा गळा कापून त्याची हत्या केली, इतकेच नाही तर त्याचे रक्त देखील प्यायला.