कॅन्सरग्रस्त मित्राच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठीच...

कॅन्सरच्या उपचारांमध्ये रुग्णाचे केस पूर्णत: गळतात.
cancer
cancerE sakal
Updated on

कॅन्सरग्रस्त मित्राच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्याच्या मित्रांनीही टक्कल केलं. मित्राला कॅन्सर झाल्याने आणि त्याच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु झाल्यानंतर त्याने केस गमावले, आपल्या मित्राला आधार देण्यासाठी सर्व मित्रांनी देखील टक्कल केलं. असं म्हंटलं जातं खरे मित्र तेच असतात, जे चांगल्या आणि वाईट परिस्थितीत साथ देतात, संकटावेळी अशा मित्रांची साथ मिळणं खूप दिलासा देणारं असतं. कुठल्याही आजारात शारीरिकपेक्षा मानसिक पातळीवरची लढाई अवघड असते.

अशाच मित्रांच्या ग्रुपने आपल्या कॅन्सरग्रस्त मित्राला आधार मिळावा आणि त्याची वेदना थोडी तरी कमी व्हावी यासाठी टक्कल केलं. कॅन्सरच्या किमोथेरफी उपचारांमध्ये पूर्ण केस जातात. 'गुडन्यूज मुव्हमेंट्स' या इन्स्टाग्राम हॅण्डलवर या मित्रांचा व्हीडीओ पोस्ट करण्यात आलाय. एका तासाच्या आत या व्हीडीओला ३ लाख जणांनी पाहिलाय. या व्हीडीओत कॅन्सरची ट्रीटमेंट घेणाऱ्या मित्राला इतर सर्व मित्र आश्चर्याचा धक्का देतात. आपसूकच सर्वांच्या डोळ्यात अश्रु तरळतात.

No One Fight Alone असं टायटल त्यांनी व्हीडीओला दिलंय. कोणीही एकटं लढू शकत नाही. त्यांना गरज असते मित्रांची आप्तस्वकीयांची. या व्हीडीओतील मित्रांनी आपले केस काढतानाचे देखील शूटींग केलेलं आहे. कुठल्याही व्यक्तीला आपले केस प्रिय असतात. पण कॅन्सर उपचारांमध्ये केस गळून जातात. यामुळे अनेकजण निराशही होतात. मात्र आपल्या मित्राच्या मनस्थितीचा विचार करुन या मित्रांनी स्वत: देखील टक्कल करत खऱ्या मैत्रीचा आदर्श समाजासमोर ठेवलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.