PM मोदी भारतात दाखल होताच बायडेन यांचे ते ट्विट रिट्विट करत म्हणाले...

PM मोदी भारतात दाखल होताच बायडेन यांचे ते ट्विट रिट्विट करत म्हणाले...
friendship between india and america is for the good of the world pm modi replied to Joe Biden's Tweet
friendship between india and america is for the good of the world pm modi replied to Joe Biden's Tweet
Updated on

चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात दाखल झाले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि भारतासोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं. यावेळी त्यांचे ट्विट रिट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिलं. (friendship between india and america is for the good of the world pm modi replied to Joe Biden's Tweet )

पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच संपलेल्या अमेरिका दौऱ्याचा व्हिडिओ बायडेन यांनी ट्विट केला. 'युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि भारत यांच्यातील मैत्री ही जगातील सर्वात महत्त्वाची मैत्री आहे. या दोन देशातील मैत्री पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, जवळची आणि अधिक गतिमान आहे.' असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

तर पंतप्रधान मोदी यांनी हे ट्विट रिट्विट करत 'मी तुमच्या मताशी सहमत आहे, या यात्रा आपल्या दोन देशांना अधिक मजबूत करेल.' असं म्हटलं आहे.

friendship between india and america is for the good of the world pm modi replied to Joe Biden's Tweet
PM Modi : ''सहा मुस्लिम देशांवर बॉम्बहल्ले करणाऱ्यांनी आम्हांला सांगू नये'' मोदींच्या बचावासाठी सीतारामण सरसावल्या

अमेरिका आणि इजिप्तचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. पालम विमानतळावर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे अनेक खासदार उपस्थित होते.

friendship between india and america is for the good of the world pm modi replied to Joe Biden's Tweet
अल्पवयीन बहिण-भावाच्या संबंधातून बाळाला जन्म! हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, "Safe Sex Education..."

20 जून रोजी पंतप्रधान मोदींनी पाच दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात केली. 21 ते 24 जून दरम्यान त्यांनी अमेरिकेला भेट दिली. त्यांची यूएस भेट न्यूयॉर्कमध्ये सुरू झाली, जिथे त्यांनी 21 जून रोजी नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात ऐतिहासिक कार्यक्रमाचे नेतृत्व केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.