Viral Video : 'सुट्टीच्या दिवशी काम करावं लागेल' ऐकताच चिडला एम्प्लॉयी, भर मीटिंगमध्येच बॉसला सुनावली खरी-खोटी

Frustrated Employee Video : या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Viral Video
Viral VideoeSakal
Updated on

जॉब करणाऱ्या लोकांना सोमवार म्हणजे आपला शत्रूच वाटतो. आठवड्याची सुरुवातच बरेच जण पुढच्या वीकेंडची वाट पाहतच करतात. शनिवार-रविवार जवळ आला की मूड अगदी चांगला होतो. मात्र, यातच जर तुमच्या बॉसने सुट्टीच्या दिवशीही कामाला बोलावलं तर?

अशा वेळी सर्वांनाच भरपूर राग येईल. मात्र, बॉसला उलटं कसं भांडायचं असा विचार करून कित्येक जण शांतपणे हो देखील म्हणतील. निखील नावाच्या एका व्यक्तीने मात्र, आपलं फ्रस्ट्रेशन बाहेर काढत चक्क मीटिंगमध्येच आपल्या बॉसला चांगलंच सुनावलं आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

हा एका झूम मीटिंगचा व्हिडिओ आहे. घर के कलेश नावाच्या एक्स हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिलीप कुमार नावाची एक व्यक्ती म्हणते, "पुढील रिपोर्टला उशीर नाही झाला पाहिजे, नाहीतर तुला शनिवार-रविवारी देखील थांबून काम करावं लागेल." यावर निखील नावाचा एक एम्प्लॉयी चिडतो. तो म्हणतो, "एक सेकंद, एक सेकंद.. शनिवार-रविवारी काम करायची गोष्ट कुठून आली?" त्यावर दिलीप कुमार पुन्हा म्हणतो, की रिपोर्ट सोमवारी मिळायलाच हवा.

Viral Video
Solar Eclipse 2023 Photos and Videos : अमेरिकेत ठिकठिकाणी दिसलं वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

यावर चिडून निखील आपला सर्व राग बाहेर काढतो. तो म्हणतो, "तुम्हाला सोमवारी रिपोर्ट मिळेल. तुम्हाला कळत नाही का? तुम्ही इतरांशी नीट बोलणं शिकायला हवं. तुम्हाला एवढीच ऑर्डर्स द्यायची हौस असेल, तर स्विग्गीवर द्या".

यामध्ये इतर एम्प्लॉयी देखील मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र, निखील बोलतच राहतो. आपण नेमून दिलेली सगळी कामं नीट आणि वेळेवर पूर्ण करत आहे. तेदेखील थोड्याशा पगारासाठी. "तुम्ही काय मला एका रात्रीत श्रीमंत नाही करणार" असंही तो म्हणतो.

Viral Video
Manushi Chillar Video: आर्यनच्या बॉडीगार्डने विश्वसुंदरी मानुषीला दिला धक्का, शाहरुखच्या लेकावर भडकले नेटिझन्स

या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कित्येक यूजर्सनी निखीलचा संताप योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर कित्येकांनी आता त्याला काढून तर नाही ना टाकलं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. "बॉसला उलटं बोलला, आता नोटीस पीरिएड देखील स्विग्गीवरुन ऑर्डर करावा लागेल" अशाही कमेंट्स यावर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.