175 प्रवासी घेऊन जाणाऱ्या विमानाला लागली आग; दिल्ली विमानतळावर एमरजेन्सी घोषित

Delhi Bangalore flight reports fire :दिल्ली एअरपोर्टवर एका विमानाला आग लागल्यानंतर एमरजेन्सी घोषित करण्यात आली आहे.
IGI airport
IGI airport
Updated on

नवी दिल्ली- दिल्ली एअरपोर्टवर एका विमानाला आग लागल्यानंतर एमरजेन्सी घोषित करण्यात आली आहे. दिल्ली ते बेंगळुरुकडे जाणाऱ्या विमानाच्या एसी यूनिटमध्ये अचानक आग लागली. या दरम्यान 175 प्रवासी विमानामध्ये होते. त्यानंतर विमानाला दिल्ली एअरपोर्टवर लँड करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमान आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. ( Delhi Bangalore flight reports fire )

एअर इंडियाचे 807 फ्लाईट बंगळुरुमधून दिल्लीकडे येत होते. विमान आकाशात असतानाच विमानाच्या एसी यूनिटमध्ये आग लागल्याची माहिती वैमानिकाला मिळाली. त्यानंतर याची माहिती वैमानिकाने दिल्ली एअरपोर्ट प्रशासनाला दिली. त्यानंतर एअरपोर्ट प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, ५ वाजून ५२ मिनिटाला विमानात आग लागल्याची माहिती मिळाली होती.

IGI airport
Flight Ticket Price : दुबईपेक्षा देशांतर्गत विमान प्रवास महाग; ५० ते ६० टक्के भाडेवाढ, पर्यटकांना उन्हाळ्यात दरवाढीचे चटके

विमानाला दिल्ली एअरपोर्टवर सुरक्षित उतरवण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली. संपूर्ण एअरपोर्टवर एमरजेन्सी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ६ वाजून ५२ मिनिटांनी विमानाला सुरक्षितपणे एअरपोर्टवर उतरवण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवासी विमानाच्या बाहेर आले. माहितीनुसार, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

IGI airport
Delayed Flights:...तर एअरलाईन्सला रद्द करावी लागणार फ्लाईट; DGCA कडून मोठा बदल

विमानात १७५ प्रवासी होते. त्यामुळे एअरपोर्ट प्रशासन सतर्क झालं होतं. काही विपरीत घडू नये यासाठी तयारी सुरू करण्यात आली होती. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. वैमानिकाने आपलं कौशल्य दाखवत सुरक्षितपणे विमान एअरपोर्टवर उतरवलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असं म्हटलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com