सोशल मीडियावर (Social Media) कायमच लहान मुलांचे फनी व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्यातील निरागसता आपण कायमच अनुभवत असतो सध्या अशाच एका चिमुकल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. रोजरोज अभ्यास करुन कंटाळलेल्या या चिमुकल्याने (child) त्याच्या शाळेतील शिक्षिकेकडे भन्नाट तक्रार केली आहे. विशेष म्हणजे त्याची ही तक्रार ऐकल्यानंतर सहाजिकच तुम्हालादेखील हसू अनावर होईल हे नक्की. (funny video of child cry because of regular study gives frustrated reply to teacher)
सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा हमसून हमसून रडत आहे. सोबतच सतत अभ्यास करुन माझं डोकं खराब झालंय अशी गोड तक्रार शिक्षिकेकडे करत आहे. एकीकडे सगळी लहान मुलं अभ्यास करण्यात मग्न असतांनाच हा चिमुकला अचानक रडू लागला. त्या रडतांना पाहून शिक्षिकेने काय झालं विचारला. त्यावर या लहानग्याने भन्नाट उत्तर दिलं.
"इतकं शिकवलं आहे की अभ्यास करुन करुन मला वेड लागायची पाळी आली आहे. डोकं खराब झालंय माझं", असं या चिमुकल्याने उत्तर दिलं.
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात असून तो पर glass.eaters या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ १.१ मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. तर, ६० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.