G-20 Summit in Delhi: चांदीची १५ हजार भांडी, सोन्याची ताटवाटी..; जी-२० परिषदेच्या पाहुण्यांसाठी राजधानीमध्ये शाही व्यवस्था

पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या ताटवाट्यांमध्ये जेवण वाढलं जाणार आहे. यामध्ये त्यांना भारतीय संस्कृतीचं आणि वारशाचं दर्शन घडणार आहे.
G 20 Summit in New Delhi
G 20 Summit in New DelhiSakal
Updated on

देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या जी २० शिखर परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. परदेशी पाहुण्याच्या खाण्यापिण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये खास पक्वानं वाढण्यासाठीची ताटं वाटीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या ताटवाट्यांमध्ये जेवण वाढलं जाणार आहे. यामध्ये त्यांना भारतीय संस्कृतीचं आणि वारश्याचं दर्शन घडणार आहे.

ही भांडी तयार करणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची कंपनी ११ हॉटेल्समध्ये भांडी पाठवत आहे, ज्यामध्ये आयटीसी ताज हॉटेलचाही समावेश आहे. या आधी जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आले होते, तेव्हा त्यांना इथल्या जेवणासोबतच भारतीय भांडीही खूप आवडली होती. त्यांनी काही विशिष्ट भांडी आपल्यासोबतही नेली होती.

G 20 Summit in New Delhi
G-20 Summit:पुतिन आणि जिनपिंग आले नाही तरी काही फरक पडणार नाही, जी-२० परिषदेबाबत जयशंकर स्पष्टच बोलले

आयरिस कंपनीचे मालक राजीव आणि त्यांच्या मुलाने सांगितलं की त्यांच्या तीन पिढ्या भांडी बनवण्याच्या कामामध्ये आहेत. या भांड्यांमध्ये संपूर्ण भारताची झलक दिसून येते. त्यांना हेतू परदेशी पाहुण्यांना जेवणाच्या टेबलावर संपूर्ण भारताची झलक दाखवणं हा आहे. त्यांच्या भांड्यांवर जयपूर, उदयपूर, बनारस पासून कर्नाटकापर्यंत विविध प्रकारचं नक्षीकाम केलेलं आहे. हे तयार करण्यासाठी त्यांना अनेक दिवस लागले. या भांड्यांचं वैशिष्ट्य असं की ही भांडी पूर्णपणे मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेली आहे. या कंपनीला १५ हजार भांड्यांची ऑर्डर मिळाली आहे.

भांडी तयार झाल्यानंतर त्यांना प्रयोगशाळेत व्यवस्थित तपासलं जातं. यानंतर हॉटेलमध्ये जशी मागणी असते, तशा पद्धतीने डिझाईन केलं जातं. उदा. महाराजा थाळीच्या अनुषंगाने ५ ते ६ वाट्या, काटा - चमचा, मीठ-मिरपूडीसाठी स्वतंत्र चांदीच्या डब्ब्या असतील. हीच भांडी आयटीसी मौर्यमध्येही वापरली जातात.

G 20 Summit in New Delhi
G-20 Summit : उद्यापासून राष्ट्रप्रमुखांची मांदियाळी; पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजधानी सजली; विमाने ‘जमिनी’ वर राहणार

ही भांडी भारतीय संस्कृती आणि वारश्याचं दर्शन घडवतात. या भांड्यांमध्ये देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या आकारातलं नक्षीकाम करण्यात आलं आहे. जी २० साठी महाराजा थाळीच्या डिझाईनसोबतच दक्षिण भारतातलंही काही वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम करण्यात आलं आहे.

विविध हॉटेल्सच्या शेफने पाहुण्यांसाठीचा मेन्यू तयार केला आहे. त्याच हिशोबाने ही भांडी बनवून घेण्यात आली आहे. जी २० साठीची ही विशेष भांडी बनवण्यासाठी बराच वेळही लागला. या भांड्यांच्या माध्यमातून भारताचा दुर्मिळ होत चाललेला वारसा दाखवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.