G20 Summit: दिल्लीत जगातील शक्तिशाली नेत्यांची मांदियाळी! कोण येणार, कोण नाही? जाणून घ्या संपूर्ण यादी

G20 Summit
G20 Summit
Updated on

G20 Summit 2023 Delhi: G20 शिखर परिषदेदरम्यान दिग्गज नेते राजधानी दिल्लीत जमणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 द्विपक्षीय बैठका घेऊ शकतात. शनिवारपासून नवी दिल्लीत दोन दिवसीय जी-20 शिखर परिषद सुरू होणार असून जागतिक मुद्द्यांवर अनेक चर्चा होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्लीला रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ते नवी दिल्लीला पोहोचतील.

या शिखर परिषदेला प्रमुख अर्थव्यवस्थांच्या G20 गटातील नेते उपस्थित राहतील आणि हवामान बदल आणि गरिबी यासारख्या जगातील सर्वात गंभीर समस्यांवर चर्चा करतील. यादरम्यान युक्रेन आणि रशिया युद्धावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि इतर राष्ट्रप्रमुख महत्वाच्या चर्चेत सहभागी असतील. दरम्यान या संमेलनात कोणते नेते सहभागी आहेत आणि कोण नाही याबाबत जाणून घेऊया.

G20 Summit
Girish Mahajan : माझा आकडा परफेक्ट असतो, आम्ही लोकसभेला 'आऊट ऑफ 48' जागा जिंकणार; महाजन यांचा दावा

या नेत्यांनी केली उपस्थित राहणार असल्याची पुष्टी

ज्या नेत्यांनी G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार असल्याची पुष्टी केली यामध्ये , अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो,  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन, हे नेत्यांची नावे आहेत.

हे नेते असतील गैरहजर -

शी जिनपिंग - हे शिखर परिषदेला सर्वात अनुपस्थित असतील. त्यांच्या अनुपस्थितीत, राज्य परिषदेचे चीनचे पंतप्रधान ली कियांग देशाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.

व्लादिमीर पुतिन - या वर्षी जी 20 शिखर परिषद येणार नाहीत. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने (ICC) रशियन राष्ट्राध्यक्षांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे. याचा अर्थ परदेशात प्रवास करताना त्यांला अटक होण्याचा धोका असतो, अशी चर्चा आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे नवी दिल्लीत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. (latest marathi news)

स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ, यांनी जाहीर केले की गुरुवारी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे ते G20 शिखर परिषदेला उपस्थित राहू शकणार नाहीत.

तसेच मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे देखील शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाही.

जी-20 नसलेले देश दिल्ली शिखर परिषदेत होणार सहभागी

जी-20 सदस्यांव्यतिरिक्त भारताने बांगलादेश, नेदरलँड, नायजेरिया, इजिप्त, मॉरिशस, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे.

या शिखर परिषदेत संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सर्वोच्च प्रशासकांचाही सहभाग असेल.

G20 Summit
G20 Summit : मनमोहन सिंग यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचं केलं समर्थन; म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()