G20 Summit : मर्सिडीज, ऑडी, लँबॉर्गिनी, बुगाटी... परदेशी पाहुण्यांसाठी मागवल्या 1,500 लग्झरी गाड्या!

Bulletproof Cars : व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी केंद्र सरकारने 20 बुलेटप्रूफ गाड्या देखील भाड्याने घेतल्या आहेत.
G20 Summit Cars
G20 Summit CarseSakal
Updated on

आजपासून दिल्लीमध्ये जी-20 परिषदेची मोठी बैठक सुरू होत आहे. आज आणि उद्या दोन दिवस ही बैठक असणार आहे. यासाठी दिल्लीच्या प्रगती मैदानावर मोठा 'भारत मंडपम' उभारण्यात आला आहे. या बैठकीला कित्येक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान उपस्थित राहतील.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून या परदेशी पाहुण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. विविध देशांच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांचं शिष्टमंडळ देखील भारतात येणार आहे. या पाहुण्यांना विमानतळावरुन हॉटेलपर्यंत नेणे, हॉटेलपासून बैठकीच्या ठिकाणापर्यंत नेणे, किंवा दिल्लीमध्ये फिरण्यासाठी कित्येक लग्झरी गाड्या आणण्यात आल्या आहेत.

G20 Summit Cars
G20 Summit: जगातील सर्वाधिक सुरक्षित विमानाने जो बायडेन आलेत भारतात, जाणून घ्या का आहे अभेद्य

कोणत्या गाड्यांचा समावेश?

परदेशी पाहुण्यांसाठी सुमारे 1258 लग्झरी गाड्या, 242 कमर्शिअल टॅक्सी आणि व्हॉल्वो बसेसची अरेंजमेंट करण्यात आली आहे. यामध्ये बुगाटी, पोर्श, बेंटले, फॉक्सवॅगन, लँबॉर्गिनी, बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज, टोयोटा आणि ह्युंडाई अशा गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये लेफ्ट हँड ड्राईव्ह - म्हणजेच स्टिअरिंग डाव्या बाजूला असलेल्या काही गाड्यांचाही समावेश आहे.

यातील कित्येक गाड्या नेपाळमधून मागवण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश गाड्या आर्मी आणि सीआरपीएफचे जवान चालवतील. विशेष पाहुण्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी 450 पेक्षा जास्त ट्रेन्ड कमांडो या गाड्या चालवणार आहेत. TV9 ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

G20 Summit Cars
G20 Summit : परदेशी पाहुण्यांसाठी उभारला 'Ask GITA' एआय चॅटबॉट! भगवद्गगीतेच्या आधारे देणार प्रश्नांची उत्तरं; पाहा व्हिडिओ

किती आहे भाडं?

जी-20 परिषदेसाठी आणण्यात आलेल्या गाड्यांचं एका दिवसाचं भाडं हे 10 हजार ते 70 हजार रुपये एवढं आहे. दिल्लीमधील कार रेंटल कंपनी केटीसीला याचं कंत्राट मिळालं आहे. विशेष म्हणजे, बीएमडब्ल्यू आणि ह्युंडाई या कंपन्यांनी जी-20 परिषदेसाठी आपल्या गाड्या मोफत उपलब्ध करुन दिल्या आहेत.

बुलेटप्रूफ कार्स

यासोबतच, व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी केंद्र सरकारने 20 बुलेटप्रूफ गाड्या देखील भाड्याने घेतल्या आहेत. यासाठी सरकारने 18 कोटी रुपये खर्च केले आहेत. या गाड्या ऑडी कंपनीच्या असणार आहेत.

G20 Summit Cars
G20 India App : जी-20 परिषदेची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार; पंतप्रधान मोदींनी लाँच केलं खास अ‍ॅप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.