China G20 Delegates : जी२० परिषदेत चिनी व्यक्तीने आणलं संशयास्पद सुटकेस, तपासणीसही दिला नकार; अखेर...

g20 summit china delegation mysterious bag  private internet demand high drama at delhi 5-Star Hotel
g20 summit china delegation mysterious bag private internet demand high drama at delhi 5-Star Hotel
Updated on

जी२० शिखरपरिषदेशाठी जगभरातील अनेक दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले होते. या परिषदेकडे जगभरातील देशांचे लक्ष लागले होते. या परिषदेसाठी दिल्लीत अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. यादरम्यान चिनी शिष्टमंडळातील एका सदस्याकडे असलेल्या एका बॅगमुळे हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचे पाहयला मिळाले. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विचीत्र प्रकार समोर आला . या घटनेत सुरक्षा यंत्रनांच्या अधिकाऱ्यांना देखील नेमकं काय करावे कळत नव्हते.

नेमकं झालं काय?

हॉटेल ताज पॅलेजमध्येचीनमधील शिष्टमंडळाचा एक सदस्य एक संशयास्पद आकाराची बॅग घेऊन जाताना दिसला. त्याच्यावर सुरक्षा यंत्रणांची नजर त्याच्यावर पडली, मात्र सुरक्षा यंत्रणांना डिप्लोमॅटिक बॅग बद्दल स्पष्ट सूचना दिलेल्या असल्याने त्याबद्दल काही केले जाऊ शकत नव्हते. तरी देखील या व्यक्तीकडील बॅगचा आकार खूपच वेगळा असल्याने यंत्रणा सतर्क झाल्या. मात्र डिप्लोमॅट प्रोटोकॉल लक्षात ठेवत सुरक्षारक्षकांनी बॅग हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास परवानगी दिली.

पण रूम व्हिजीटदरम्यान खोलीत गेलेल्या एका कर्मचाऱ्याने बॅगेत काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याची माहिती दिली. काही वेळातच हा मेसेज वरिष्ठांपर्यंत पोहोचला. यानंतर मात्र हालचालींना वेग आला आणि सुरक्षा टीमला ती बॅग स्कॅनरमधून पास करण्यास सांगण्यात आले. यानंतर मात्र वातावरण चांगलेच गंभीर बनले.

g20 summit china delegation mysterious bag  private internet demand high drama at delhi 5-Star Hotel
RSS News : मंदिरातील 'आरएसएस'च्या शाखेवर बंदी; हायकोर्टाचे पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश

चिनी लोक त्यांच्या बॅग्ज, विशेषत: आत काय आहे ते दाखवण्यास तयार नव्हते. त्यामुळे जवळपास 12 तास ही तणावाची स्थिती कायम होती. शेवटी चिनी पाहुण्यांनी ती संशयास्पद बॅग चिनी दूतावासात पाठवण्याचे मान्य केल्यावर प्रकरण मिटले. महत्वाची बाब म्हणजे चीनच्या शिष्टमंडळाने स्वतःसाठी स्वतंत्र आणि खाजगी इंटरनेट कनेक्शन देण्याची मागणी केली होती परंतु हॉटेल यासाठी नकार दिला.

चीनी सुटकेसमध्ये काय होतं हे गूढंच राहीलं. हॉटेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी हॉटेलमधून त्या संशयास्पद वस्तू हटवून त्या चीनच्या दूतावासात परत पाठवण्याचे मान्य केल्यानंतर परिस्थीती निवळली. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जी२० शिखर परिषदेचे पुढील यजमान ब्राझील चे राष्ट्रपती देखील त्याच हॉटेलात राहत होते.

g20 summit china delegation mysterious bag  private internet demand high drama at delhi 5-Star Hotel
Libya Flood Update : लीबियामध्ये विनाशकारी महापूर! आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मृत्यू, १० हजार नागरिक बेपत्ता

बॅगेत काय असू शकतं?

ताज पॅलेसमधील सुरक्षेशी संबंधीत सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, चीनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी उपकरांची तपाणी करण्याच्या विनंतीचा विरोध केला मात्र भारतीय सुरक्षा अधिकारी आपल्या मागणीवर ठाम राहिले. तीन सदस्यांच्या टीमला खोलीच्या बाहेर तब्बल १२ तास पहारा द्यावाल लागला. त्यानंतर चीनच्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने ती बॅग चीनच्या दूतावासात पाठवण्याचे मान्य केले. या उपकरणांबद्दल एका अधिकाऱ्यांने सांगितले की ते सर्विलान्स सेटअप होतं असं निश्चितपणे सांगता येणार नाही, कारण त्या उपकरणांची तपासणी करण्याची संधी मिळाली नाही.

g20 summit china delegation mysterious bag  private internet demand high drama at delhi 5-Star Hotel
Apple Event 2023 : नवीन आयफोन, अ‍ॅपल वॉच, नवी ओएस.. अ‍ॅपलच्या इव्हेंटमध्ये काय काय झालं लाँच? जाणून घ्या

एका गुप्तचर अधिकाऱ्याने वरिष्ठांना पाठवलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की अशा उपकरणांचा वापर सेक्योर कम्युनिकेशन चॅनेल्स ब्लॉक आणि ठप्प करण्यासाठी केला जातो. मात्र, सुटकेसमध्ये काय होते हे रहस्यच राहिले.

दरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत झालेल्या G20 परिषदेला आले नव्हते. त्यांच्या जागी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी या परिषदेला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे चीनचे शिष्टमंडळ विशेष विमानाने नाही तर चार्टर्ड फ्लाइटने दिल्लीला पोहोचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.