G20 Summit India PM Modi-Joe Biden Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात आज रात्री दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीणकुमार जगन्नाथ यांच्यासोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठक घेण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोहोचणार आहेत आणि G20 शिखर परिषदेच्या समारोपानंतर रविवारी ते व्हिएतनामला रवाना होतील.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा पहिला भारत दौरा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन 9-10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. याआधी, भारताला भेट देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते, जे फेब्रुवारी 2020 मध्ये भारत भेटीवर आले होते. (G20 Summit India PM Modi-Joe Biden Meet)
कुठे राहणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये राहणार आहेत. या हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी दोन बेडरूमचा प्रेसिडेंशियल सूट बुक करण्यात आला आहे. ते ज्या सूटमध्ये राहणार आहे त्याचे नाव 'चाणक्य' आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये खास लिफ्टही बसवण्यात आली आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामा, जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर यांनीही भारत भेटीदरम्यान या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. (G20 Summit India)
कोणत्या विषयांवर होऊ शकते चर्चा?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या चर्चेत भारत-अमेरिकेतील सर्वसमावेशक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेणे अपेक्षित आहे.
पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत बहुपक्षीय विकास बँका (MDBs) या वित्तीय संस्थांच्या सुधारणांसह तंत्रज्ञान आणि संरक्षण मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. विशेषत: जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या विकासावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
भारताची बहुपक्षीय विकास बँकांबद्दलची भूमिका काय?
भारताने सातत्याने असा युक्तिवाद केला आहे की बहुपक्षीय विकास बँका (MDBs) 21 व्या शतकासाठी कार्यक्षम नाहीत. हवामान बदल, महामारी आणि स्थलांतर यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यास या संस्था पुरक नाहीत, यासाठी नवीन आर्थिक धोरण आणि नवीन दृष्टिकोन आवश्यक आहे.
बहुपक्षीय विकास बँकांचे महत्त्व
बहुपक्षीय विकास बँका (MDBs) या वित्तीय संस्था आहेत ज्या विकसनशील देशांना त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कर्ज, अनुदान आणि तांत्रिक सहाय्य पुरवतात.
MDBs मध्ये जागतिक बँक समूह, आशियाई विकास बँक, आफ्रिकन विकास बँक, आंतर-अमेरिकन विकास बँक इ. चा समावेश आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या विकासासाठी MDB ची भूमिका महत्त्वाची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.