Gaganyaan: गगनयान मिशनच्या टेस्टिंगची तारीख ठरली! जाणून घ्या डिटेल्स

चांद्रयान-3 आणि आदित्य L1 या यशस्वी मोहिमांनंतर आता इस्रो गगनयान मोहीम सुरु करणार आहे.
Gaganyaan
Gaganyaan
Updated on

बंगळुरु : चांद्रयान-3 आणि आदित्य L1 च्या मोहिमेच्या यशस्वीतेनंतर आता इस्रो आपल्या गगनयान या मानवरहित मोहिमेची टेस्टिंग करणार आहे. शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ वाजण्याच्या सुमारास या यानाची टेस्टिंग केली जाणार आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मंगळवारी याची माहिती दिली. (Gaganyaan Flight Test Vehicle Abort Mission scheduled at 8 am Saturday)

शनिवारी होणार उड्डाण

इस्रोच्या माहितीनुसार, मिशन गगनयान टीव्ही डी १ चं उड्डाण २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७ ते ९ वाजण्याच्या सुमारास श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात येणार आहे.

२१ ऑक्टोबरला टीव्ही डी१ या यानाच्या उड्डाणानंतर गगनयान कार्यक्रमांतर्गत आणखी तीन परीक्षण यानाचं मिशनही सुरु होईल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिली. (Marathi Tajya Batmya)

Gaganyaan
Ajit Pawar: मीरा बोरवणकरांच्या कथित आरोपांवर अजित पवारांचं स्पष्टीकरण; थेट सादर केलं 'ते' पत्र

मानवाची अंतराळ सैर

इस्रो आपल्या गगनयान मोहिमेंतर्गत मानवाची एक टीमला पृथ्वीच्या ४०० किमीपेक्षा अधिक उंचीवरील कक्षेत पाठवणार आहे. तसेच भारतीय समुद्रात हे यान सुरक्षितरित्या उतरवण्याच्या क्षमतेची चाचणी केली जाणार आहे. जर भारतानं हे यशस्वीरित्या करुन दाखवलं तर अशी कामगिरी करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतर चौथा देश बनेल. (Latest Marathi News)

Gaganyaan
Same Sex Marriage: "आता आमदार-खासदारांनी आमच्यासाठी लढायचं"; याचिकाकर्त्यांनी सांगितला पुढचा प्लॅन

उद्देश काय?

या चाचणी यानाचा (टीव्हीडी१) उद्देश क्रू मॉडेलची चाचणी करणं हा आहे. कारण पुढील वर्षाच्या शेवटी गगनयानाच्या प्रत्यक्ष उड्डाणावेळी भारत अंतराळात प्रवाशांना घेऊन जाणार आहे. टीव्ही डी१ या यानाच्या चाचणीमध्ये मानवरहित क्रू मॉड्युलला बाहेरच्या कक्षेत प्रक्षेपित केलं जाणार आहे. पृथ्वीवर परत आणणं आणि बंगालच्या खाडीत यशस्वीरित्या उतरणं हे या मोहिमेचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.