Gandhi Jayanti 2023 : गांधीवादातून आपण काय शिकले पाहिजे?

दुसऱ्यांना माफ करा, माफ करणं हे सर्वात मोठं काम आहे.
Gandhi Jayanti 2022
Gandhi Jayanti 2022Esakal
Updated on

Gandhi Jayanti 2023 : आज 2 ऑक्टोबर 2023 म्हणजे महात्मा गांधी यांची 154 वी जयंती. अहिंसा आणि असहकार सारख्या शस्त्रातून महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी बापूंना 'महात्मा'  ही पदवी दिली होती. महात्मा गांधीचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला होता. गांधी यांनी लंडनमधून वकीलीचे शिक्षण पूर्ण केले आणि दक्षिण आफ्रिकेत काही वेळ स्थायिक होते.

त्यानंतर महात्मा गांधी भारतात परतले. गांधी यांचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना भारत भ्रमण करण्याचा सल्ला दिला. पुढे मग महात्मा गांधीनी भारतात प्रवास केला आणि संपूर्ण भारत देश जाणून घेतला. महात्मा गांधींनी बिहारमध्ये 1917 साली शेतकर्‍यांसाठी आंदोलन केले. बिहारच्या चंपारण्यमध्ये निळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकर्‍यांचे ब्रिटिशांकडून शोषण होत होते, तेव्हा गांधींनी याविरोधात आवाज उठवला आणि सत्याग्रह केला. याच सत्याग्रहामुळे ब्रिटिशांनी माघार घेत वेठबिगारी बंद केली आणि शेतकर्‍यांकडून कमी सारा घेतला जाईल असे ब्रिटिशांनी जाहीर केले.

त्यानंतर महात्मा गांधीनी मिठासाठी दांडी मार्च काढला, ब्रिटिंशाच्या जुलमी अत्याचाराविरोधात कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोडो आंदोलन छेडले होते. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला. त्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी नथूराम गोडसे या माथेफिरूने महात्मा गांधींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आज महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आहे त्यानिमित्ताने आपण आजच्या या लेखात गांधीवादातून नेमक्या कोणत्या गोष्टी शिकून त्या आत्मसाद केल्या पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Gandhi Jayanti 2022
Mahatma Gandhi Statue: कॅनडात गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना, भारताकडून दुःख व्यक्त, तपास सुरू

जो बदल तुम्हाला जगात किंवा आजूबाजूला घडवायचा असेल तो बदल आधी तुम्ही स्वतः मध्ये घडवा असं महात्मा गांधी म्हणायचे. महात्मा गांधींचा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण समाजातील अनेक गोष्टींविषयी तक्रारी करत बसतो. आपल्याला समाजात अनेक बदल अपेक्षित असतात. मग त्या बदलांना आपल्या स्वत:पासून सुरुवात करावं असं महात्मा गांधी म्हणतात. महात्मा गांधी म्हणायचे की मी परिपूर्ण नाही, माझ्यात ही अनेक वाईट गोष्टी आहेत. पण इतरांच्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी पाहतो. 

Gandhi Jayanti 2022
Mahatma Gandhi: सातवेळा झाला मारण्याचा प्रयत्न; वाचा सविस्तर!

एखाद्याने गुन्हा केलाच तर त्याला माफ करा, त्याच्याबद्दल बदलाची भावना ठेवू नका असं गांधीजी म्हणायचे. 'An Eye For An Eye Makes Whole World Blind' असं जर झालं तर, प्रत्येकजण बदलाची भावना मनात ठेवून कृती करु लागला तर संपूर्ण जगच हिंसेच्या मार्गावर चालेल, जगातली मानवता संपेल असं गांधीजी म्हणायचे. त्यामुळे कुणाचंही भलं होणार नाही. त्यामुळे दुसऱ्यांना माफ करा, माफ करणं हे सर्वात मोठं काम आहे. एखाद्याला माफ करणं हे दुर्बलतेचं लक्षण नसून ते शूराचं लक्षण आहे.

Gandhi Jayanti 2022
Mahatma Gandhi : इतिहास 8 ऑगस्टचा; महात्मा गांधीजींच्या चळवळीने ब्रिटीश राजसत्ता हादरली होती

लहान गोष्टींमुळे तुम्ही जगात सकारात्मक बदल घडवू शकता, एखाद्या छोट्याच्या गोष्टींमुळे तुम्ही जग बदलू शकता, एक अगदी लहान गोष्ट करून तुम्ही जगामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता असं महात्मा गांधी म्हणतात. कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात ही एखाद्या लहान बदलापासून होत असते. मिठासारख्या अगदी सामान्य गोष्टीचा वापर करुन गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरोधात सर्वात मोठा लढा उभा केला हा त्याचाच भाग. त्यामुळे अगदी लहान गोष्टीच्या माध्यमातूनही आपण मोठं काहीतरी काम करु शकतो. कर्म करत राहणे, फळाची चिंता न करणे असं भगवद्गितेत सांगितलं आहे. तीच गोष्ट गांधीजींनी आयुष्यभर कटाक्षाने पाळली.

Gandhi Jayanti 2022
Mahatma Gandhi: येरवडा तुरुंगात महात्मा गांधींनी बनवला होता फोल्डिंग चरखा, या महालात 2 वर्ष होते नजरकैद

गांधीजींनी स्वत: आयुष्यभर साध्या राहणीमानाचं तत्व पाळलं. आपल्याला गरजेपुरत्या गोष्टी बाजूला ठेवायचं, भौतिकवाद नाकारायचा ही गांधीजींची शिकवण. आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच वापरा, कारण पृथ्वी सर्वांच्या गरजा पुरवू शकते पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण करू शकत नाही असं ते म्हणायचे. गरजेपेक्षा जास्त घेणं हे पुढच्या पिढीसाठी त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी समस्याकारक ठरु शकतात. भविष्यातील पीढी ही तशीच होऊ शकते, त्यामुळे भौतिक गोष्टीवर भर नको असं ते म्हणायचे. आपण जो विचार करतो, तशाच पद्धतीने वागतो. मनुष्य हा त्याच्या विचाराचा प्रोडक्ट असतो, एखाद्या व्यक्ती ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने त्याची जडणघडण होती असं महात्मा गांधी म्हणायचे. एखाद्या व्यक्तीच्या मनात जो विचार येतो त्या पद्धतीने त्याचे वर्तन असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.