Gandhi Jayanti Speech : गांधी जयंतीला मुलांना लिहून द्या असं साधं सोपं भाषण

गांधी जयंतीला अनेक शाळांमध्ये मुलांसाठी भाषण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात
Gandhi Jayanti Speech
Gandhi Jayanti Speechesakal
Updated on

Gandhi Jayanti Speech : महात्मा गांधी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार अजरामर आहेत. त्यांच्या विचांरांतून ते आपल्यात जीवंत असल्याची जाणीव कायम असेल. गांधीजींचे भारतातच नव्हे तर भारताबाहेरसुद्धा चाहते आहेत.लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत. गाधीजींनी सांगितलेले विचार, त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची मुलांना आठवण करून देण्यासाठी दरवर्षी गांधी जयंतीला अनेक शाळांमध्ये मुलांसाठी भाषण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

तुमच्या मुलांना शाळेतील भाषण स्पर्धेत किंवा निबंध स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर इथून तुम्ही काही आयडियाज घेऊ शकता.

Gandhi Jayanti Speech
Gandhi jayanti 2022: आजवर या दिग्गज अभिनेत्यांनी साकारलेत महात्मा गांधी..

सर्व आदरणीय शिक्षक/शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय मित्रांना माझा नमस्कार

"जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनने महात्मा गांधीबाबत असे म्हटले होते की, भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना यावर विश्वास ठेवणे कठीण होईल की हाडा मासांचा बनलेला असाही एखादा व्यक्ती पृथ्यीवर जन्माला आला होता. आजच्याच दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबरला या महान व्यक्तीचा जन्म झाला होता. या महत्वाच्या दिवशी आपण त्यांचे महान विचार आणि त्यांनी जगाला दिलेला संदेश जाणून घेण्यास एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम मी त्यांना नमन करते/करतो आणि आपल्या भाषणाला सुरुवात करते/करतो.

संपूर्ण जगावर ज्यांच्या विचारांचा आजही प्रभाव दिसून येतो ते आपले बापू अर्थात महात्मा गांधी. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणून हाक मारायचे.

Gandhi Jayanti Speech
Gandhi Jayanti 2023 : गांधी जयंतीसाठी कमी वेळात तयार होईल या विषयांवरील भाषण, एकदा नजर तर फिरवा

गांधीजींनी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक मोठ मोठी आंदोलने केली. चले जाव आंदोलन, भारत छोडो आंदोलन यांसारख्या आंदोलनातून त्यांनी लाखो भारतीयांना एकत्र आणले आणि एकजूटीने ब्रिटीशांविरोधात शांतीच्या मार्गाने लढा दिला. (Gandhi Jayanti)

गांधीजींचा जन्म दिवस २ ऑक्टोबर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही ओळखला जातो. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. ही त्यांना दिलेली खरी आजरांजली ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.