एक चिंगारी थे सावरकर! 'गांधी स्मृती'च्या विशेषांकात चक्क सावरकारंचं महिमा मंडन

गांधी स्मृती व दर्शन समितीतर्फे प्रकाशित होणाऱया ‘अंतिम जन' या नियतकालिकाने चक्क स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एक विशेषांक प्रकाशित केल्याने जोरदार वाद सुरू
Gandhi Smriti controversy over Vinayak Damodar Savarkar magzine antim jan
Gandhi Smriti controversy over Vinayak Damodar Savarkar magzine antim janSakal
Updated on
Summary

गांधी स्मृती व दर्शन समितीतर्फे प्रकाशित होणाऱया ‘अंतिम जन' या नियतकालिकाने चक्क स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एक विशेषांक प्रकाशित केल्याने जोरदार वाद सुरू

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या गांधी स्मृती व दर्शन समितीतर्फे प्रकाशित होणाऱया ‘अंतिम जन' या नियतकालिकाने चक्क स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एक विशेषांक प्रकाशित केल्याने जोरदार वाद सुरू झाला आहे. विशेषतः समितीचे सर्वेसर्वा व भाजप नेते विजय गोयल यांनी, सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान गांधीजींच्या बरोबरीचे असल्याचा ‘शोध' संपादकीय लेखात लावल्याने गांधी वाद्यांच्या संतापात भर पडली आहे. गांधीहत्येच्या कटकारस्थानात सहभागी असल्याबद्दल सावरकरांना १९४८ मध्ये अटक जाली होती व १९४९ मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली होती.

महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी जेथे हत्या झाली तेथे गांधी स्मृती या संस्थेचे मुख्यालय आहे. याच संस्थेच्या वतीने गांधीविचारांना वाहिलेले ‘अंतिम जन' प्रकाशित करण्यात येते. सध्या गोयल हे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. अंतिम जनचा ताजा अंक सावरकर विशएषांक असून त्यातील १५ पैकी १२ गौरव लेख सावकरांवर व ३ लेख गांधीजींबाबत आहेत. त्यात "एक चिंगारी थे सावरकर", "गांधी और सावरकर का संबंध", "वीर सावरकर और महात्मा गांधी", "देश भक्त सावरकर"आदींचा समावेश आहे.

गोयल यांनी संपादकीयात म्हटले आहे की ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी एक दिवसही तुरुंगवास भोगला नाही, देश व समाजासाठी काही काम केले नाही ते सावरकरांच्य बलिदानावर टीका करतात. खरे तर सावरकरांचे इतिहासातील स्थान व स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा सन्मान गांधींपेक्षा कमी नाही. भारताच्या स्वातंत्र्यात सावरकरांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारतात व भारताबाहेर क्रांतिकारी चळवळी करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. सावकरांना घाबरून ब्रिटीश सरकारने १९१० व १०११ असा दोन वेळा त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. एखाद्याला दोनदा जन्मठेपेची, काळ्या पाण्याची शिक्षा होणे ही जगाच्या इतहासातील एकमेव घटना आहे. देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना सावरकरांसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकांचेही स्मरण ठेवायला हवे.

गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी ‘सकाळ' शी बोलताना सांगितले की या मंडलींना स्वतःला सिध्द करण्यासाठी जही बापूजींना ‘शरण' जावे लागते, त्यांचेच प्रमाणपत्र गरजेचे असते, हे यातून सिध्द होते. गांधीहत्येशी जोडलेल्या स्मारकाच्या नियतकालितकात ज्याचे नाव गांधीजींच्या हत्येच्या खटल्यात थेटपणे व सप्रमाण आले त्या व्यक्तीचे महिमा-मंडन केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. मात्र यात मला आश्चर्य वाटलेले नाही. जे सरकार सध्या देशात सत्‍तेवर आहे त्यांना आपल्या नियंत्रणाखालील संस्थांतही आपलेच विचार दिसतात. देशभरातील गांधीविचारांच्या संस्था सरकारच्या कब्जापासून दूर रहाव्यात अशी काळजी स्वातंत्र्योत्तर काळातील सरकारांनी घेतली. मात्र आता या संस्थांवर दी कब्जाकरून नंतर गांधीविचारच खलास करून टाकण्याचे कारस्थान अत्यंत वेगवानपणे पुढे नेले जात असल्याचे हे उदाहरण आहे. गांधी स्मृती संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान राहतील. मात्र त्याचे सारे कामकाज पहाणारे उपाध्यक्ष व व्यवस्थापन समिती यांच्या कामात सरकारी हस्तक्षेप असमार नाही, याचीसदोदित काळजी घेतली गेली होती. आता सत्ताधारी या मूल्याचीही ‘पत्रास' ठेवण्यास तयार नाहीत हे दुःखद आहेत.

या वादाबाबत ‘सकाळ' ने गोयल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते ‘बाहेर' गेल्याचे समजते. मात्र, त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले की ‘‘या विशेषांकात गांधींवर कोठेही टीका केलेली नाही. हा सावरकर विशेषांक असून त्यांच्या कर्तुत्वापुरताच तो सीमीत आहे. यात गांधीहत्येबाबतही त्यात काही नाही.‘‘

गांधी स्ममृतीचा हा अंक पाहून गांधीजींचा आत्मा स्वर्गात तडफडत असेल असे सांगून राजदचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. सुबोदकुमार यांनी म्हटले की अंतिम जन चा हा सावरकर विशेषांक म्हणजे अहिंसा व इतर गांधीमूल्यांची क्रूर थट्टा आहे. यांचा पुढचा गौरव अंक गोडसे, हिटलर व मुसोलिनीवर निघाला तर आश्चर्य वाटायला नको. आता या गुन्ह्याबद्दल जरा जरी लाज-शरम वाटत असेल तर उपाध्यक्षांसह गांधी स्मृतीच्या साऱया पदाधिकाऱ्यांनी देशाची माफी मागून तात्काळ राजीनामा द्यावा.

गांधी शांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार प्रशांत यांच्या मते, खोटे बोलण्याचा व इतिहास विकृत रूपात सांगण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. भाजप व त्यांचे सरकार या अधिकाराचा पुरेपूर वापर करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नाही याचे उत्तम उदाहरण ‘अंतिम जन'चा हा अंक आहे. विजय गोयल यांनी स्वतःचा राजकीय वनवास संपविण्यासाठी हे टोकाचे कलच्या पातळीवरील पाऊल उचलले आहे. मात्र ते वस्तुस्थितीला वनवासात का पाठवत आहेत ? असा उपरोधिक सवाल कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी केला.

या एका घटनेनंतर किंवा सावरकर यांना भारतरत्न दिले की हे प्रकार थांबणार नाहीत. गांधीविरोधी सरकार देशात आहे तोवर सरकार गांधीविचार व त्याच्याशी संबंधित संस्थांवर कब्जा करून न ‘गांधीविचार' मुळापासून नष्ट करण्याचे हे नियोजनबध्द कारस्थान वारंवार होत रहाणार.

- तुषार गांधी, महात्मा गांधींचे पणतू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.