Ganesh Baraiya : कमी उंची असूनही त्याने हार मानली नाही, आता जगातील सर्वात लहान डॉक्टर होण्याच्या शर्यतीत

Ganesh Baraiya : उंची कमी असल्यामुळे त्याला लहानपणापासून अनेकदा हिणवण्यात आले. त्याची चेष्टा करण्यात आली. मात्र, त्याने शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द काही सोडली नाही.
Ganesh Baraiya
Ganesh Baraiyaesakal
Updated on

Ganesh Baraiya : “लहरों से डरकर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नही होती” या हिंदी कवितेच्या ओळी खऱ्या आयुष्यात ही अगदी तंतोतंतपणे लागू होतात. हे अगदी खरे आहे. या कवितेच्या ओळी खऱ्या करून गणेश बरैय्याने एक वेगळेच उदाहरण जगासमोर ठेवले आहे. अवघी ३ फूट उंची आणि केवळ १८ किलो वजन असलेल्या गणेशने नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या इंटर्नशिप करत आहे.

जगातील सर्वात तरूण डॉक्टर म्हणून, तो स्पर्धा करण्यास तयार असल्याचे मत गुजरातमधील भावनगर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मेहता यांनी व्यक्त केले आहे. गणेश आज डॉक्टर झाला आहे, मात्र, इथपर्यंतचा त्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आज आपण गणेशची ही अनोखी गोष्ट जाणून घेऊयात.

Ganesh Baraiya
First Woman Fire Fighter : आजोबा, वडील अन् आता 'नात'.. ! कशी बनली मेघना पुण्याची पहिली महिला फायर फायटर?

आईने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते

गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील गोरखी गावामध्ये वास्तव्यास असलेल्या गणेशला डॉक्टरकीचे शिक्षण देण्याचे स्वप्न त्याच्या आईने देवूबेन यांनी पाहिले होते. गणेशच्या आईने पाहिलेले हे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. हालाखीची परिस्थिती असलेल्या गणेशच्या कुटुंबात त्याची आई देवूबेन या गृहिणी असून त्याचे वडील विठ्ठल हे शेतकरी आहेत.

शिवाय, त्याला ७ बहिणी असून तो एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या सात ही बहिणींची लग्ने झाली असून, त्याच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने दहावीच्या पुढे शिक्षण घेतलेले नाही. तो एकटाच आहे, की ज्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने डॉक्टरकीचे उच्च शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

डॉक्टर होण्यापर्यंतचा गणेशचा प्रवास हा काही सोपा नव्हता. उंची कमी असल्यामुळे त्याला लहानपणापासून अनेकदा हिणवण्यात आले. त्याची चेष्टा करण्यात आली. मात्र, त्याने शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द काही सोडली नाही.

बारावीमध्ये ८७% गुण मिळवल्यानंतर त्याने मेडिकल प्रवेशसाठी प्रयत्न केले. मात्र, २०१८ मध्ये गणेशला आणि इतर दोन अपंग विद्यार्थ्यांना गुजरात सरकारने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारला होता. मात्र, त्याने हार मानली नाही.

त्याने त्याचे डॉक्टरकीचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द सोडली नव्हती. गुजरात सरकारने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारल्यानंतर त्याला त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि विश्वस्तांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर, हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले.

सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहचल्यानंतर, अपंग व्यक्तींचे हक्क कायदा २०१६ चा हवाला देत निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूने दिला. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आदेश दिले. त्यानंतर, गणेशला भावनगर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळाला. त्यानंतर, गणेशने मागे वळून पाहिले नाही. तो आता जगातील सर्वात तरूण डॉक्टर म्हणून इतरांशी स्पर्धा करण्यास पात्र असल्याचे त्याच्या कॉलेजचे डीन डॉ. हेमंत मेहता सांगतात.

गणेश करतोय इंटर्नशिप

भावनगर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २२ वर्षीय गणेश बरैय्याने इंटर्नशिप सुरू केली आहे. जेमतेम ३ फूट उंच आणि केवळ १८ किलो वजन असलेला गणेश रूग्णांची तपासणी करतो.

मात्र, उंची कमी असल्यामुळे रूग्णांची तपासणी करताना, त्याला त्याच पाय पसरावे लागतात. कमी उंचीमुळे गणेशच्या शरीराचा ७२ टक्के भाग हा लोकोमोटिव्ह डिसॅबिलिटीने बाधित झाला होता. मात्र, आता वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हसतमुखाने लोकांवर उपचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.