मोठी दुर्घटना! हरियाणात गणपती विसर्जनावेळी 7 जणांचा बुडून मृत्यू, 4 जणांना वाचवण्यात यश

गणपतीच्या विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडलीय.
Haryana Ganesh Visarjan 2022
Haryana Ganesh Visarjan 2022 esakal
Updated on
Summary

गणपतीच्या विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडलीय.

चंदीगड : हरियाणात (Haryana) गणपतीच्या विसर्जनावेळी (Ganesh Visarjan 2022) मोठी दुर्घटना घडलीय. हरियाणात गणपतीचं विसर्जन करताना 7 जणांचा बुडून मृत्यू झालाय. सोनीपतमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाला, तर महेंद्रगडमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झालाय.

सोनपतमधील मिमारपूर घाटावर एक व्यक्ती आपला मुलगा आणि पुतण्यासोबत गणपतीच्या विसर्जनासाठी गेला होता. या लोकांचा बुडून मृत्यू झालाय. पोलिसांनी सांगितलं की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरूय. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महेंद्रगडमधील कनिना-रेवाडी मार्गावरील झगडोली गावाजवळील कालव्यावर गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यासाठी गेलेले सुमारे नऊ जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. रात्री उशिरा आठ जणांना कालव्यातून बाहेर काढण्यात आलं. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला.

Haryana Ganesh Visarjan 2022
Rajasthan : जीप-ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

महेंद्रगड येथील झगडोली गावाजवळील गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुमारे 20-22 जण कालव्यावर गेले होते. यादरम्यान अनेकांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत 4 मुलांना जीव गमवावा लागला असून 4 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय. याबाबत दु:ख व्यक्त करताना हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, 'महेंद्रगड आणि सोनीपत जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान कालव्यात बुडून अनेक लोकांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे.' तर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या एका दुःखद घटनेत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर उन्नावमधील रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. ही मुलं गंगा नदीत गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी गेली होती.

Haryana Ganesh Visarjan 2022
Maharashtra Rain : महाराष्ट्रात आज पावसाचा 'यलो अलर्ट'; हवामान विभागाचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.