भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी गंगा नदीच्या पाण्यासंदर्भात मोठा खुलासा केलाय. गंगा नदीच्या पाण्यातून शास्त्रज्ञांना असे काही संकेत मिळाले आहेत ज्यातून गंगा नदीच्या पाण्याचा गुणवत्ता स्तर घसरला असल्याचे दिसून आले आहे. गंगेच्या उपनद्या अलकनंदा आणि भागीरथी नदीच्या पाण्यात 'मायक्रो इनवर्टेब्रेट्स' प्रदूषणामुळे नष्ट होत चालल्याचेही शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
पाण्यातील विषाणू नष्ट करणारे 'मायको इनवर्टेब्रेट' म्हणजेच मित्र जीवाणूंची पाण्यातील संख्या कमी झाल्याने पाणी आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे शास्त्रज्ञांच्या अभ्याासातून लक्षात आले आहे. (Ganga River News) भागीरथी नदीमध्ये गोमुखपासून ते देवप्रयागपर्यंत अनेक स्थळांवर पाण्यातील विषाणू नष्ट करणारे जीवाणू पाण्यात अत्यंत कमी प्रमाणात असल्याने पाण्यातील स्वच्छपणा विस्कटली असून हे पाणी दूषित होण्यास सुरूवात झाली असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. शास्त्रज्ञ यावर एक विस्तृत रिपोर्ट तयार करत आहेत.
पाण्याचं स्वास्थ्य बिघडवण्यास ही कारणे जबाबदार
नदीच्या काठावर होत असलेल्या विकासकार्यानंतर त्याचा राडारोडा थेट नदीत टाकल्या जातोय. तसेच नदी किनारी वसलेल्या शहरांतील घाण पाणी त्यावर काहीही प्रक्रिया न करता नदीत सोडल्या जातंय. बॅट्रियाफोस बॅक्टेरीया पाण्यातील विषाणूंमुळे होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमुळे तयार होणाऱ्या विषारी पदार्थांना खाऊन टाकतो. त्यामुळे पाण्याची शुद्धता टिकवून ठेवण्यास मदत होते.
शास्त्रज्ञांच्या मते, गंगेच्या पाण्यामध्ये भरपूर सल्फर असल्याने त्याची शुद्धता अबाधित राहते आणि गंगेचे पाणी जास्त काळ खराब होत नाही. अवघ्या एक किलोमीटरच्या प्रवाहात गंगा स्वतःची घाण साफ करते. देशातील इतर नद्या पंधरा ते वीस किलोमीटरच्या प्रवाहानंतर स्वतःला स्वच्छ करू शकतात आणि त्यात सापडलेली घाणही गंगा स्वच्छ करते हे वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे.
गंगेच्या दोन्ही उपनद्यांमध्ये पाण्याची गुणवत्ता ही १५ टक्क्यांच्या खालच्या पातळीला पोहोचली आहे. कोणत्याही नदीचा इटीपी इंडेक्स २० टक्क्यांच्या घरात असला की पाण्याची गुणवत्ता बरी असल्याचे कळते. तर ३० टक्क्यांच्या वर इटीपी इंडेक्स असेल तर त्या नदीचं पाणी अति स्वच्छ असल्याचे कळते.
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वीपी उनियाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निखिल सिंगने वेगवेगळ्या स्थळावरील मायक्रो इनवर्टेब्रेट म्हणजेच मित्र जीवाणूंचं संशोधन केलं. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) अंतर्गत शास्त्रज्ञांनी मन (बद्रीनाथ) ते अलकनंदा नदीतील देवप्रयाग आणि भागीरथी नदीतील गोमुख ते देवप्रयागपर्यंत अभ्यास केला. शास्त्रज्ञांच्या मते, इतर नद्यांच्या पाण्यापेक्षा गंगेच्या पाण्यात वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे.
इतर नद्यांच्या तुलनेत गंगेतील घाण पचवण्याची क्षमता 20 पट अधिक असल्याचे आढळून आले आहे. गंगेची घाण शोषण्याची क्षमता 20 पट अधिक आहे.गंगेच्या उपनद्या भागीरथी, अलकनंदा, महाकाली, कर्नाली, कोसी, गंडक, सरयू, यमुना, सोन नदी आणि महानंदा नद्या या गंगेच्या मुख्य उपनद्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.