New Delhi : रेल्वे प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 कर्मचाऱ्यांना अटक

चौकशीनंतर या घटनेत सहभागी असलेले अन्य तीन आरोपीही रेल्वे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
navi delhi crime case
navi delhi crime case
Updated on
Summary

चौकशीनंतर या घटनेत सहभागी असलेले अन्य तीन आरोपीही रेल्वे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नवी दिल्ली - नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावरुन सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवरच मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे स्थानकावर एका महिलेवर दोन नराधमांनी बलात्कार केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील इतर दोघांनी आरोपींना साथ दिली आहे. (navi delhi crime case)

दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या पोलिसांनी या घटनेसंदर्भात कारवाई करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. चौकशीनंतर या घटनेत सहभागी असलेले अन्य तीन आरोपीही रेल्वे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे इतर फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छापे टाकले आहेत. या छाप्यात तीन आरोपींना पकडण्यात आले आहे. हे चारही आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (gange rape in new delhi railway station platform)

navi delhi crime case
MH Rain Update : राज्यात पुढील 3-4 दिवसांत मेघगर्जनेसह मुसळधार, IMD चा अंदाज

मिळालेली माहिती अशी की, या पीडित महिलेचे वय 28 वर्ष असून यातील एका आरोपीशी महिलेची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. दरम्यान, यातील एका आरोपीने पीडित महिलेला काहीतरी कारण सांगून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर बोलवून घेतले. आणि रेल्वे स्थानकावरील एका खोलीत बोलावून नेले. ही खोली प्लॅटफॉर्मवरील फूट ओव्हर ब्रिजखाली विद्युत विभाग आणि इतर विभागांतील उपकरणे ठेवण्यासाठी बांधण्यात आली आहे.

यानंतर त्या खोलीत त्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. या आरोपींनी महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला आहे अशी माहिती मिळत आहेत. या प्रकरणात इतर दोघांनीही आरोपीची साथ दिल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.

navi delhi crime case
'कटकारस्थान करून अपयश आलं की, सांगायचं संबंध जपणं महाराष्ट्राची संस्कृती'

दरम्यान, पिडीत महिलेने शुद्धीवर आल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांना कॉल केला. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर सामूहिक बलात्काराची बातमी ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. यानंतर रेल्वे पोलिसांसह रेल्वे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पीडित महिलेशी चौकशी करुन प्रकरणी जाणून घेतले. सामूहिक बलात्काराची घटना घडवणारा मुख्य आरोपी रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती जीआरपीला मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.