Atiq Ahmed : पंतप्रधान मोदींच्या विरोधातही त्याने लढवली होती निवडणूक; विजयाची अपेक्षाही होती!

त्याने जेलमध्ये असतानाच निवडणुकीचा अर्ज भरला होता.
Atiq Ahmed
Atiq AhmedSakal
Updated on

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर अतिक अहमदची देशभर चर्चा आहे. पण तुम्हाला माहित आहे का त्याने पंतप्रधान मोदींच्या विरोधातही निवडणूक लढवली होती.

अतिक अहमद हा पाचवेळा आमदार तर एकदा खासदार म्हणून निवडून आला होता. १९८९ ते २००२ पर्यंत तो चार वेळा अलाहाबाद पश्चिम या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून ओआला होता. २००२ मध्ये पुन्हा समाजवादी पार्टीच्या तिकिटावरुन आमदार झाल्यानंतर त्याने पक्ष सोडला आणि स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. अपना दल असं या पक्षाचं नाव.

Atiq Ahmed
Atik Ahmed Murder Case : 'जय श्रीराम' म्हणत झाडल्या गोळ्या; पत्रकार बनून आले होते अतिक,अशरफचे मारेकरी

२००४ साली पुन्हा एकदा याच मतदारसंघातून तो आमदार झाला. २००९ सालीही तो समाजवादी पार्टीच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आला. त्यानंतर मात्र त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातच शड्डू ठोकला. मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून तो २०१९ च्या लोकसभेसाठी उभा राहिला. जेलमध्ये असताना त्याने अर्ज दाखल केला, पण त्याला केवळ ८३३ मतं मिळाली.

Atiq Ahmed
Atik Ahmad Case : दिल्लीचा नेता, पुण्यात अबू सालेम; अतिक अहमदच्या एन्काऊंटर झालेल्या मुलाचं कनेक्शन समोर

नरेंद्र मोदींना मात्र या निवडणुकीत ६,७४,६६४ मतं मिळाली होती. त्यावेळी निवडणुकीसाठी अतिकने पॅरोलची मागणीही केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली. कोणत्याही प्रचाराशिवाय अतिकने ८८३ मतं मिळवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.