Lawrence Bishnoi Gang : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटरची हरियाणात निर्घृण हत्या; हातपाय बांधून पेटवलं

Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई गँगमधील शूटरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Lawrence Bishnoi Latest News
Lawrence Bishnoi Latest News
Updated on

लॉरेन्स बिश्नोई गँगमधील शूटरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंबीहा गँग (Bambiha Gang) ने गँगस्टर लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) याचा खास शूटर राजन याची हत्या केली आहे. इतकेच नाही तर त्याला पेटवण्यापूर्वी हातपाय बांधण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

राजन हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा खास शूटर असल्याची सांगितले जात आहे. तसेच त्याच्याविरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. बंबीहा गँगने या हत्येनंतर फेसबुकवर एक पोस्ट देखील केली आहे.

राजन कुरुक्षेत्र येथील रहिवासी आहे. तसेच तो बिश्नोई गँगमधील खास शूटर मानला जातो. बंबीहा गँगच्या शूटर्सनी हरियाणामधील यमुना नगर येथे त्याला गोळ्या घातल्या आणि त्यानंतर मृतदेह जाळून टाकल्याची सांगितले जात आहे. दहशतवादी गँगस्टर अर्श डल्ला याच्या इशाऱ्यावर ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गँगने सोशल मीडियावर एक पोस्ट करत या हत्येची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. दरम्यान हरियाणा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान विदेशात बसून बंबीहा गँगचा म्होरक्या गँगस्टर लकी पटियाल आणि कॅनडा येथे असलेला गँगस्टर आणि खलिस्तानी अर्श डल्ला याने बिश्नोई गँग शूटर राजन याची हत्या घडवून आणल्याचे बोलले जात आहे.

Lawrence Bishnoi Latest News
Sarfaraz Khan In Ind Vs Eng : अखेर कष्टाचं चीज झालं! सरफराज खानला टीम इंडियात मिळाली संधी

बंबीहा गँगने लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी यांना चॅलेंज करत एक पोस्ट लिहीली आहे. यामध्ये सिद्धू मूसेवाला याला काही दोष नसताना ठार केलं. कॅनडा मध्ये सुक्खा दुनुके याला विश्वासात घेऊन ठार केलं. आम्ही सुक्खाच्या मर्डरचा बदला घेतला आहे. लवकरच सर्वांचा हिशोब चुकता केला जाईल.

Lawrence Bishnoi Latest News
Maratha Reservation : नारायण राणेंची मराठा आरक्षणावरील पत्रकार परिषद रद्द; म्हणाले, पदापेक्षा जात, धर्म अन् देश...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.