गँगस्टर विकास दुबे आणि उज्जैनचे महाकाल मंदिर; काय आहे कनेक्शन?

gangster vikas dubey visits ujjain mahakal temple every year mother sarita devi
gangster vikas dubey visits ujjain mahakal temple every year mother sarita devi
Updated on

उज्जैन (मध्य प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि आठ पोलिसांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विकास दुबे याला आज, मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये 3 जुलै रोजी झालेल्या चकमकीत आठ पोलिस हुतात्मा झाले होते. त्यानंतर दुबे फरार होता. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कसा सापडला विकास दुबे?
कानपूरमधील चकमकच नव्हे तर, हत्या, खंडणी, अपहरण यांसारखे खटले असलेल्या विकास दुबे गेल्या सहा दिवसांपासून उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यातील पोलिसांना गुंगारा देत होता. दुबे हा गुरुग्राम किंवा नोएडा परिसरात लपून बसल्याची चर्चा होती. तसेच तो नेपाळला पळून गेल्याचंही बोललं जात होतं. परंतु, कानपूरमधून दिल्लीत आलेल्याचे पुरावे सापडल्यानंतर पोलिस दुबेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत होते. आज, सकाळी नऊच्या सुमारास मात्र, विकास दुबे उज्जैनच्या महाकाल मंदिरात अलगद सापडला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एका सिक्युरिटी गार्डने त्याला ओळखल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली. 

वर्षातून एकदा मंदिराला भेट
दरम्यान, मध्य प्रदेशातील उज्जैनचे महाकाल मंदिर आणि गँगस्टर विकास दुबे यांचे एक कनेक्शन कुटुंबियांकडून सांगण्यात आले. विकास दुबेचे सासर हे मध्य प्रदेशातील आहे. महाकाल मंदिराप्रती विकास दुबेला खूप श्रद्धा होती. तो दर वर्षी न चुकता उज्जैनला महाकाल मंदिरात जातो, अशी माहिती त्याची आई सरिता देवी यांनी पोलिसांशी बोलताना दिली. 

विकासला अटक झाली, याविषयी मी काय बोलते याला फारसं महत्त्व नाही. सरकार योग्य ती कारवाई करत आहे. 
- सरिता देवी, विकास दुबेच्या आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.