वॉरन बफेटना मागे टाकून अदानी ग्रुपचे मालक गौतम अदाणी हे जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मागील वर्षीच ते आशियातील सर्वात श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी होते. फोर्बजने नुकतीच ही यादी प्रसिद्ध केलीय. तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेत.
अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी यांच्याकडे १२३.७ अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचं फोर्ब्जने म्हंटलंय. तर वॉरेन बफेट यांच्याकडे १२१.७ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. १९८८ साली त्यांनी कापड उद्योगातून सुरुवात केली होती. २००८ मध्ये पहिल्यांदा ते फोर्ब्जच्या यादीत झळकले होते. सध्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या व्यस्त विमानतळ ठरलेल्या मुंबई विमानतळामध्ये देखील त्यांची ७४ टक्के इतकी गुंतवणूक आहे. तसचं वीजनिर्मिती क्षेत्र, विमानळ आणि बंदरांमध्ये देखील अडाणी ग्रूपची मोठी गुंतवणूक आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत टेस्लाचे मालक इलॉन मस्क हे पहिल्या क्रंमाकावर आहेत. त्यानंतर अमेझॉनचे जेफ बेजॉस, बर्नार्ड अरनॉल्ट आणि मायक्रोफ्टचे बिल गेट्स हे अदानींच्यापेक्षा श्रीमंत व्यक्ती आहेत. मार्च २०२१ मध्ये अदानींची संपत्ती ५० अब्ज डॉलर होती. मार्च २०२२ मध्ये त्यांची संपत्ती जवळजवळ दुप्पट झाली होती. अदानींच्या मालकीच्या कोळशाच्या खाणी आहेत, तसेच वीजवितरण, बंदर आणि विमानतळ याव्यतिरिक्त मिडीयातही त्यांची गुंतवणूक आहे.
फोर्बजच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे आठव्या स्थानावर असून त्यांची संपत्ती १०४.७ अब्ज डॉलर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.