नवी दिल्ली - भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. सर्वप्रथम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. त्यांनी एकूण संपत्तीत वॉरन बफे आणि बिल गेट्स यांना मागे टाकले होते. आता त्यांची वाटचाल जेफ बेझोस आणि इलॉन मस्क यांच्या पुढे जाण्याच्या दिशेने सुरू झाली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अदानींची ही 'झेप' मोठी कामगिरी मानली जात आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळपास एका वर्षाच्या कालावधीत $64.8 अब्ज वरून $141.4 अब्ज पर्यंत दुप्पट झाली आहे. ते आता जगातील तिसरे क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहे.
गौतम अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड ७५० पटीहून अधिक नफा कमवत आहेत. तर अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेडचे मूल्य ४५० पटीने वाढले आहे. त्या तुलनेत, मस्क यांच्या टेस्ट इंकची प्राईज टु अर्निंग रेशो सुमारे 100 पट आहे. तर अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेशो 28 पट आहे.
कॉलेज ड्रॉपआऊट अदानी यांना एकेकाळी खंडणीसाठी ओलिस ठेवण्यात आले होते. अदानी दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते. अदानी यांनी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला कोळसा आणि बंदरांच्या व्यावसायाकडे वळण्यापूर्वी मुंबईच्या हिरे उद्योगात आपले नशीब कमावले. आता विमानतळांपासून डेटा सेंटर्स, मीडिया आणि सिमेंटपर्यंत प्रत्येक गोष्टीत अदानी यांनी साम्राज्य निर्माण केले. गेल्या वर्षी, त्यांनी जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उत्पादक बनण्यासाठी हरित ऊर्जेमध्ये $70 अब्ज गुंतवण्याचा संकल्प केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.