दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या वकील करुणा नंदी, उद्योगपती गौतम अदानी आणि प्रख्यात काश्मिरी मानवाधिकार कार्यकर्ते खुर्रम परवेझ यांना टाइम मॅगझिने 2022 मधील जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले आहे. आयकॉन्स, पायोनियर्स, टायटन्स, आर्टिस्ट, लीडर्स आणि इनोव्हेटर्स या सहा श्रेणींमध्ये ही यादी विभागली गेली आहे. (gautam adani karuna nundy khurram parvez among time s 100 most influential people)
अॅपलचे सीईओ टिम कुक (Apple CEO Tim Cook) आणि अमेरिकन होस्ट ओप्रा विन्फ्रे (Oprah Winfrey) यांच्यासह अदानी यांचे नाव टायटन्स कॅटगरीत देण्यात आले आहे, तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्यासमवेत नंदी आणि परवेझ यांना लीडर्स कॅटगरीत स्थान मिळाले आहे.
Time मासिकाने म्हटले आहे की नंदी या केवळ एक वकील नाही, तर एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. ज्या सक्षमपणे आणि धैर्याने बदल घडवून आणण्यासाठी न्यायालयाच्या आत आणि बाहेर काम करतात. त्यांनी बलात्कार प्रतिबंधक कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी काम केलं आहे आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणे लढवली आहेत.
टाईममधील अदानीचे प्रोफाइलनुसार, "अदानीचा एकेकाळी प्रादेशिक व्यवसाय आता विमानतळ, खाजगी बंदरांपासून ते ग्राहकोपयोगी वस्तूंपर्यंत विस्तारला आहे. अदानी समूह ही जगातील सहाव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठी राष्ट्रीय स्तरावरील कंपनी आहे, अदानी हे लोकांच्या नजरेपासून दूर राहून शांतपणे आपले साम्राज्य उभारत आहेत, असे म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.