Gautam Adani : NDTV मध्ये हस्तक्षेप करणार का? गौतम अदानींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

gautam adani on ndtv said there will be laxmanrekha between editorial and management in ndtv
gautam adani on ndtv said there will be laxmanrekha between editorial and management in ndtv
Updated on

NDTV मीडिया ग्रुप काही दिवसांपूर्वी अदानी ग्रुपने विकत घेतला, त्यानंतर गौतम अदानींची मुलाखत चर्चेत आली आहे. NDTV स्वतंत्रपणे चालवता येईल का, गौतम अदानी त्यात हस्तक्षेप करणार का? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. याबाबत गौतम अदानी यांनी एका मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी गौतम अदानी यांनी एनडीटीव्ही स्वतंत्रपणे काम करत राहणार असल्याचं म्हटले आहे.

NDTV बद्दल काय म्हणाले गौतम अदानी?

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत गौतम यांना विचारण्यात आले की, तुम्ही एनडीटीव्ही विकत घेतले आहे, तुम्ही तुमच्या इतर उद्योगांप्रमाणे यातही हस्तक्षेप करणार नाही का? संपादकीय स्वातंत्र्य कसे ठरवावे? उत्तरात अदानी म्हणाले की, NDTV हे विश्वसनीय, स्वतंत्र आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क राहील. त्यांनी पुढे सांगितले की व्यवस्थापन आणि संपादकीय यांच्यामध्ये नेहमीच एक लक्ष्मणरेषा असेल. ते म्हणाले की, मी सांगतोय की थोड्या कालावधीत सर्व काही स्पष्ट होईल.

gautam adani on ndtv said there will be laxmanrekha between editorial and management in ndtv
Anil Deshmukh : 'गोरे गोरे मुखडे पे…'; अनिल देशमुख या गाण्यामुळे पहिल्यांदाच बनले होते आमदार

प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनीही दिला होता राजीनामा

एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड (RRPH) मधून राजीनामा दिल्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये सुदीप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल चेंगलवारायन यांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली होती. RRPRH च्या मंडळावर नवीन संचालकांची निवड करण्यात आली होती.

gautam adani on ndtv said there will be laxmanrekha between editorial and management in ndtv
Ajit Pawar : अजितदादांमध्ये हिम्मत असेल असं वाटलं होतं, पण..; बावनकुळेंनी पुन्हा डिवचलं

रवीश कुमार यांनीही दिला राजीनामा

तसेच यानंतर एनडीटीव्हीमध्ये दीर्घकाळ पत्रकारिता करणारे रवीश कुमार यांनीही त्यांचा राजीनामा दिला होता. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रवीश कुमार यांना जेव्हा विचारण्यात आले की ते राजकारणात जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, मला राजकारणात ढकलण्याचे अनेक दिवसांपासून प्रयत्न होत आहेत, पण तरीही टीव्ही माझ्या मनात येत राहतो.

तसेच कॉंंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सामील होण्याबाबत विचारले असता रवीश कुमार म्हणाले होते की, मी कव्हर करण्यासाठी नक्कीच जाऊ शकतो पण सहभागी होण्यासाठी जाणार नाही.

gautam adani on ndtv said there will be laxmanrekha between editorial and management in ndtv
Anil Deshmukh : 'ज्यांनी देशमुखांवर ही वेळ आणली त्यांचा पंतप्रधानांनी…'; शरद पवारांचं मोठं विधान

एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी त्यांचे बहुतांश शेअर्स अदानी समूहाला विकले आहेत. प्रसिद्धीपत्रकात दोघांनी सांगितले की, ओपन ऑफर आल्यानंतर गौतम अदानी यांच्याशी चर्चा सुरू होती आणि ती सकारात्मक झाली. त्यानंतर त्यांनी शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.