Adani Brothers : गौतम अदानी भारताचे तर, बंधू विनोद दुबईचे कुबेर; संपत्ती ऐकून व्हाल हैराण

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरल्यानंतर त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
Adani Brothers
Adani Brothers Sakal
Updated on

Vinod Shantilal Adani : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरल्यानंतर त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. IIFL Hurun India Rich List 2022 नुसार गौतम अदानी यांची एका वर्षात दररोजची कमाई 1612 कोटी रुपये आहे. त्यानंतर आता त्यांचे भाऊ विनोद शांतीलाल अदानी यांच्या कमाईची चर्चा सुरू झाली असून, हुरुनने जारी केलेल्या यादीनुसार विनोद शांतीलाल अदानी हे सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय आहेत.

Adani Brothers
Employee : जा जी ले अपनी जिंदगी! ई-कॉमर्स कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणा

विनोद शांतीलाल अदानी हे दुबईत वास्तव्यास असतात. तेथून ते दुबई, जकार्ता आणि सिंगापूरमधील व्यवसाय सांभाळतात. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 37,400 कोटींनी वाढली आहे. विनोद अदानी हे भारतातील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 850 टक्क्यांनी वाढ झाली असून, आता त्यांची संपत्ती 1.69 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. दोन्ही अदानी बंधूंच्या संपत्तीची बेरीज केली तर, त्यांच्याकडे एकूण 16.63 लाख कोटींची संपत्ती आहे, जी हुरुन श्रीमंतांच्या यादीतील टॉप 10 लोकांच्या संपत्तीच्या 40 टक्के इतकी आहे.

Adani Brothers
Gautam Adani : भारताचे कुबेर उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर; कारण अस्पष्ट

94 श्रीमंत अनिवासी भारतीयांनी मिळवलं स्थान

आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये एकूण 94 श्रीमंत अनिवासी भारतीयांनी स्थान मिळवले आहे. ज्यामध्ये विनोद शांतीलाल अदानी यांनी दररोज 102 कोटी रुपयांची मालमत्तेचा समावेश आहे. या यादीत हिंदुजा ब्रदर्स दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती 1.65 लाख कोटी रुपये आहे. त्यापाठोपाठ आर्सेलर मित्तलचे लक्ष्मी निवास मित्तल यांचा क्रमांक लागतो. ज्यांची संपत्ती 1.5 लाख कोटी आहे.

Adani Brothers
Vastu Tips: हातात पैसा टिकत नसेल तर तिजोरीत ठेवा ही फुले, श्रीमंत व्हाल!

विनोद अदानी यांनी 1976 मध्ये भिवाडीमध्ये व्ही आर टेक्सटाइल्स नावाच्या कंपनीच्या माध्यमातून पावर लूमची सुरूवात केली. यानंतर त्यांनी सिंगापूरमध्ये कार्यालय उघडले. 1994 मध्ये ते दुबईला गेले आणि आखाती देशांमध्ये त्यांचा व्यवसाय वाढवण्यास सुरूवात केली. दुबईत त्यांनी साखर, तेल, अॅल्युमिनियम, तांबे आणि लोखंडी स्क्रॅपचा व्यवसाय केला. या वस्तू उत्पादक देशांकडून विकत घेऊन ते या वस्तूंची गरज असणाऱ्या देशांना विकत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.