Gautam Adani Secret: देशातल्या सगळ्यात श्रीमंत माणसालाही तुमच्यासारखंच व्यसन; बायकोच्या हट्टापायी...

बालहट्ट आणि स्त्रीहट्टा पुढे मोठमोठे लोक हार मानतात असं म्हणतात. त्याचं प्रत्यक्ष उदाहरणच इथे बघायला मिळतं.
Gautam Adani Secret
Gautam Adani Secretesakal
Updated on

Gautam Adani Family Secret : बालहट्ट आणि स्त्रीहट्टा पुढे मोठमोठे लोक हार मानतात असं म्हणतात. त्याचं प्रत्यक्ष उदाहरणच इथे बघायला मिळतं. देशातल्या सर्वात श्रीमंत माणसालाही हा हट्ट मोडता येत नाही. मग कितीही बिझी असले तरी रात्री घरी येऊन बायकोसोबत वेळ घालवावाच लागतो.

उद्योजक गौतम अदानी हे देशातले सर्वात श्रीमंत तर जगातले तिसऱ्या क्रमांकाने श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाविषयाचं सिक्रेट 'आप की अदालत' या कार्यक्रमात शेअर केलं.

म्हटलं तर हे त्यांच्या सुखी कुंटुंबाचं सिक्रेट आहे नाहीतर स्त्री हट्टा पुढे नमलेला नवरा. पण अदानी सांगतात की, रोज ऑफीसमधून घरी गेल्यावर ते पत्नी प्रिती सोबत रम्मी पपलू खेळतात.

Gautam Adani Secret
Gautam Adani : प्रतिस्पर्धी असलेल्या अंबानींबद्दल अदानी यांचं मोठं वक्तव्य म्हणाले, मी तर त्यांचा...

रम्मीचा नादच खुळा म्हणतात ते काही खोटं नाही. एकदा चटक लागली की, व्यक्तीला त्याचं व्यसन लागतं.

त्याच धरतीवर अदानी सांगतात की, "हे आमचं सिक्रेट आहे की, मी रात्री ऑफीसमधून घरी गेल्यावर पत्नी सोबत रोज रम्मी खेळतो. ८ ते १० डाव झाल्याशिवाय आम्ही झोपतच नाही. यात बहुतेक वेळा पत्नीच जिंकते."

Gautam Adani Secret
Gautam Adani : राहुल गांधींची धोरणे विकासविरोधी नाहीत; अदानींचं मोठं विधान

देशातल्या टॉप टेन श्रीमंत लोकांमध्ये अदानी हे क्रमांक एक वर आहेत. त्यांच्यानंतर मुकेश अंबानी यांचा नंबर येतो. पहिले अंबानी एक नंबरवर होते. पण काही काळापासून ती जागा अदानी यांनी घेतली आहे. त्यानंतर राधाकिशन दमानी, सायरस पुनावाला, शिव नाडर, सावित्री जिंदल, दिलीप संघवी आदींचा नंबर लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()