Gautam Adani : मार्केटची दिशा बदलणार?; 'या' व्यवसायातही खणखणणार अदानींचं नाणं

अदानींच्या या व्यवसायामुळे मार्केटची दिशा बदलणार असल्याचेही बोलले जात आहे.
Gautam Adani
Gautam Adani Sakal
Updated on

Gautam Adani Super App : आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता नव्या व्यवसायात पाउलं ठेवणार आहे. अदानींच्या या व्यवसायामुळे मार्केटची दिशा बदलणार असल्याचेही बोलले जात आहे. गौतम अदानी सुपर अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत असून, या सुपर अॅपमुळे मार्केटचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

Gautam Adani
Air India-Vistara Merge : टाटांचा विस्तार वाढला; 'एअर इंडिया' अन् 'विस्तारा'चं होणार विलीनीकरण

सुपर अॅप म्हणजे नेमकं काय?

सुपर अॅप म्हणजे असे अॅप ज्याद्वारे एकाच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना अनेक सेवांचा लाभ सहज घेणे सोपे होते. सुपर अॅपमुळे खरेदीसाठी ग्राहकांना वेगवेगळ्या अॅपवर जाण्याची गरज भासत नाही.

या सुपर अॅपद्वारे ग्राहकांना किराणा, फॅशन, शिक्षण, राईड, आरोग्यसेवा यासारख्या सेवा एकाच ठिकाणी देण्यासाठी उदयास येत असून ही बाजारपेठ आता काबीज करण्यासाठी अदानींनी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

Gautam Adani
Digital Rupee : चलनी नोटांची छपाई होणार इतिहासजमा?; RBI कडून डिजिटल रुपयाची घोषणा

पुढील 3-6 महिन्यांत सुरू होणार

विमानतळावरील प्रवाशांना अदानी समूहाच्या इतर सेवांशी जोडण्यासाठी पुढील 3-6 महिन्यांत 'सुपर अॅप' सुरू करण्याची योजना आदानींकडून आखली जात आहे. अदानींचे हे सुपर अॅप एका इन-हाउस स्टार्टअपद्वारे निर्मित असल्याचेही सांगितले जात आहे.

गौतम अदानींना नेमका फायदा काय?

गौतम अदानींचे हे सुपर अॅप अदानींच्या विमानतळांच्या नेटवर्कवरील हवाई प्रवाशांना अदानी समूहाद्वारे प्रदान केलेल्या इतर सेवांशी जोडण्याचे काम करेल. या पद्धतीने या अॅपचे जास्तीत जास्त डाउनलोडर वाढवण्याचा अदानींचा मानस आहे.

Gautam Adani
History of Touchwood : तरूणांकडून नेहमी उच्चरला जाणारा 'टचवुड' शब्द कुठून आला? असा आहे इतिहास

कुठून आली सुपर अॅपची संकल्पना

सोशल मीडिया आणि फायनान्सशिवाय ऑनलाइन शॉपिंग, पेमेंट, मनोरंजनासाठी एकाच ठिकाणी सेवा देण्याचे सुपर अॅपचे मॉडेल चीनमधून आले आहे. चीनमध्ये अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड, टेनसेंट होल्डिंग्स लिमिटेड आणि मीटुआन यांनी यापूर्वीच अशा स्वरुपाचे सुपर अॅप लॉन्च केले आहे.

प्रवास खडतर

कोविडच्या काळात जरी अॅप व्यवसाय आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या व्यवसायात जगभरात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहण्यात आले होते. मात्र, अदानींना सुपर अॅप लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अतिशय खडतर प्रयत्न करावे लागणार आहे. कारण, या क्षेत्रात टाटा समूहाचे Tata Neu आणि मुकेश अंबानीचे JioMart ने ग्राहकांमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व प्रस्थापित केले आहे.

Gautam Adani
Lottery Winner : नादखुळा भिडू! १४ वेळा जिंकली लॉटरी, अखेर समोर आलं सिक्रेट अन्...

जागतिक बाजारपेठेतील सुपर अॅप प्लेअर कोण

चीनमध्ये WeChat, Alipay, भारतात Paytm, इंडोनेशियात Goto, सिंगापूरमध्ये ग्रॅब, व्हिएतनाममध्ये Jalo आणि दक्षिण कोरियाचे काकाओसह अनेक लोकप्रिय सुपर अॅप्स आधीच जागतिक बाजारपेठेत अस्तित्वात आहेत. त्यामुळे अदानींच्या येऊ घातलेल्या सुपर अॅपला किती लोकप्रियता मिळते हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()