नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गेल्या सोमवारी आपल्या पाच दिवसीय दौऱ्यासाठी दिल्लीला पोहोचल्या. त्यांनी मंगळवारी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासहित काँग्रेसचे नेते आनंद शर्मा आणि कमलनाथ यांची भेट घेतली. त्यांनतर त्यांनी काल सायंकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना देखील भेटणार आहेत. दरम्यान, आज ममता बॅनर्जी यांनी अनेक प्रश्नांची नेहमीप्रमाणे सडेतोड उत्तरे दिली आहेत. ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींविरोधात आपला एल्गार व्यक्त करताना म्हटलंय की, संपूर्ण देशात 'खेला' होईल. ही एक सततची प्रक्रिया आहे. जेंव्हा २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुका असतील, तेंव्हा ती निवडणूक 'मोदी विरुद्ध देश' अशीच असेल.
पुढे त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदी २०१९ मध्ये लोकप्रिय होते. आज त्यांनी मृतदेहांचा देखील नीटसा हिशेब ठेवला नाहीये. अंतिम संस्कार देखील नाकारले गेलेत आणि मृतदेह गंगेमध्ये फेकण्यात आले आहेत. ज्यांच्या नातेवाईकांसोबत हे घडलंय ते कधीच हे विसरणार नाहीत आणि माफही करणार नाहीत. आम्हाला देशात 'अच्छे दिना'ऐवजी 'सच्चे दिन' पहायचे आहेत. २०२४ साली तुम्ही विरोधकांच्या एकजुटीचा चेहरा असाल का, या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलंय की, मी काही राजकीय ज्योतिषी नाहीये, हे सगळं त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. इतर कोणी नेतृत्व केल्यास मला काही हरकत नाही. जेव्हा या विषयावर चर्चा होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ शकतो. मी निर्णय थोपवू शकत नाही. आज माझी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत भेट आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर विरोधी पक्षांनी नक्कीच भेटलं पाहिजे.
पेगॅसस प्रकरणाबद्दल त्या म्हणाल्या की, माझा फोन ऑलरेडी टॅप केला गेलाय. जर अभिषेक मुखर्जींचा फोन टॅप केला गेला असेल आणि मी जर त्याच्यासोबत बोलत असेल तर अर्थातच माझाही फोन टॅप होणारच आहे. पेगॅससने प्रत्येकाचं आयुष्य धोक्यात टाकलं आहे. आय-पॅक टीमच्या सदस्यांना अगरतालामध्ये कैद करण्यात आल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मी आमच्या काही लोकांना त्रिपूराला पाठवलं आहे, जिथे त्यांना एका घरात नजरकैदेत ठेवण्यात आलंय. सध्या जीडीपी हा शब्द गॅस-डिझेल-पेट्रोल या तीन गोष्टींचं प्रतिनिधीत्व करतो. सध्या केंद्र सरकार जनतेकडून पैसा गोळा करत आहे मात्र त्यांच्याकडे कोरोना लसीसाठी पैसे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.