Manipur: मणिपूरच्या हिंसाचारात चीनचा हात? माजी लष्करप्रमुख नरवणेंनी सरकारकडून व्यक्त केली अपेक्षा

सीमेवरील राज्ये अशांत राहणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
army chief Manoj naravane
army chief Manoj naravane
Updated on

Manipur Violence : ईशान्येकडील राज्य मणिपूर गेल्या तीन महिन्यांपासून अस्थिर बनलं आहे. इथली कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली असून जातीय हिंसाचारानं इथं परमोच्च बिंदू गाठला आहे. यामुळं देशभरात मोठी खळबळ आहे. यावरच आता माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी एक शंका व्यक्त केली आहे. त्याची केंद्र सरकारकडून दखल घेतली जाईल याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. (General Manoj Naravane on Manipur expressed expectations from govt)

army chief Manoj naravane
Colonial Legacy Ends: 'अमृत काला'त इंडियन नेव्हीची 'ही' प्रथा होणार बंद; वसाहतवादाचा आणखी एक वारसा संपला

काय म्हणाले माजी लष्करप्रमुख

इंडिया इंटरनॅशनल सेंटर इथं 'राष्ट्रीय सुरक्षा परिप्रेक्ष्य' या विषयावर आयोजित एका चर्चेदरम्यान मणिपूरमधील हिंसाचारावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जनरल नरवणे बोलत होते. ते म्हणाले, सीमावर्ती भागातील अस्थिरता देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्य नाही.

मणिपूरमध्ये विविध विद्रोही संघटनांना चीनकडून मदत पुरवली जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मणिपूरमधील हिंसाचाराबाबत चीनच्या एजन्सीजचा सहभाग असल्याचं नाकारता येणार नाही. उलट मी म्हणेन की यामध्ये त्यांचा निश्चित सहभाग असेल आणि पुढेही सुरु राहिलं. सत्ताधाऱ्यांनी याची निश्चित दखल घ्यायला हवी, असंही नरवणे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

army chief Manoj naravane
Uddhav Thackeray: "दर आठवड्याला एक माणूस फोडा..."; उद्धव ठाकरेंचं शिंदे अन् भाजपला आवाहन!

'इंडिया'चे खासदार मणिपूरमध्ये पोहोचले

विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीचे २१ खासदार मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये दाखल झाले आहेत. आज आणि उद्या असा दोन दिवस त्यांचा दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते हिंसाचारग्रस्त भागांचा आढावा घेणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

तसेच चुराचांदपूर इथल्या दिलासा कॅम्पला भेट देणार आहेत, तसेच कुकी पीडितांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. मणिपूरच्या घटनेनं देशाची प्रतिमा मलीन केली असून आम्ही इथं राजकारण करायला आलेलो नाही. आपल्या सर्वांना इथल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढायला हवा असं यावेळी काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.

army chief Manoj naravane
Sambhaji Bhide Controversy : "गांधीजींसारखा दुसरा होणे नाही"; भिडेंवर राज ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा?; मनसेनं शेअर केली पोस्ट

मणिपूरचा विषय काय आहे?

३ मार्च रोजी मणिपूरमध्ये मैतेई समुदयाच्या अनुसुचीत जमातींचा दर्जा देण्याविरोधात कुकी समाजानं निषेध आंदोलन केलं होतं. या आंदोलनात हिंसाचार झाला होता. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी १००० हून अधिक लोकांच्या जमावानं एका गावावर हल्ला केला होता.

तसेच तीन महिलांना निर्वस्त्र करुन रस्त्यावरुन त्यांची धिंड काढली होती, यातील दोन महिलांचा व्हिडिओ तब्बल तीन महिन्यानंतर म्हणजे याच जुलै महिन्यात आठवड्याभरापूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

या व्हिडिओनंतर संपूर्ण देशभरात मोठा संतापाचं वातावरण बनलं होतं. या घटनेवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानं आत्तापर्यंत इथल्या परिस्थितीवर एकही शब्द न बोललेले पंतप्रधान मोदींनी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधताना दुःख व्यक्त करत संबंधितांना कडक शासन करण्याचे निर्देश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.