नवी दिल्ली : भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या निवृत्तीनंतर जनरल मनोज पांडे यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. जनरल मनोज पांडे हे २९ वे लष्करप्रमुख बनले आहेत. ते याआधी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते.
जनरल मनोज पांडे 1 फेब्रुवारी रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याअगोदर ते आर्मी कमांडचे प्रमुख होते. त्यांना सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सेक्टरमधील वास्तविक नियंत्रण रेषेचे (एलएसी) रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे.
आपल्या कारकिर्दीत, जनरल पांडे यांनी अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN) चे कमांडर-इन-चीफ म्हणूनही काम केले आहे, जे भारतातील एकमेव तिन्ही संरक्षण सेवेमध्ये कान करणारे कमांड आहेत. लष्करप्रमुखपदाचे सूत्र हातात घेतल्यावर आता त्यांना भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांच्याशी थिएटर कमांड्स रोल आउट करण्याच्या सरकारच्या योजनेवर समन्वय साधावा लागणार आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी थिएटरायझेशन योजना लागू केली होती. त्यानंतर सरकारने अद्याप जनरल रावत यांच्या उत्तराधिकारीची नियुक्ती केलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.