'...योग्य असेल ते करा'; गलवान संघर्षावेळी आर्मीला मिळाला होता 'फ्री हँड'; माजी लष्करप्रमुखांनी सांगितला 'तो' किस्सा

माजी आर्मी चीफ जनरल एमएम नरवणे यांनी त्यांचे आत्मचरित्र 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी'मध्ये ३१ ऑगस्ट, २०२० च्या रात्रीचा उल्लेख देखील केला आहे.
general mm narvane on Galwan Valley conflict in  Four Stars of Destiny an Autobiography incident with rajnath singh
general mm narvane on Galwan Valley conflict in Four Stars of Destiny an Autobiography incident with rajnath singh
Updated on

देशाचे माजी आर्मी चीफ जनरल एमएण नरवणे यांनी गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षाबद्दल माहिती देताना सराकरने त्यांना फ्री हँड दिला होता, अशी माहिती समोर आली आहे. नरवणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दलची माहिती दिली आहे,

जेव्हा चिनी सैन्य रणगाड्यांसह पूर्व लडाखमधील एलएसीपर्यंत पोहोचले होते, तेव्हा गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने लष्कराला 'फ्री हँड' दिला होता. तसेच राजनाथ सिंह यांनी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांना मी पंतप्रधानांशी बोललो आहे, जे योग्य असेल ते करा, असं सांगितले होतं.  

general mm narvane on Galwan Valley conflict in  Four Stars of Destiny an Autobiography incident with rajnath singh
Ram Temple Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अडवाणींना येऊ नका म्हणून सांगितलं; पण का? चंपत राय म्हणाले...

माजी आर्मी चीफ जनरल एमएम नरवणे यांनी त्यांचे आत्मचरित्र 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी'मध्ये ३१ ऑगस्ट, २०२० च्या रात्रीचा उल्लेख देखील केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, त्या रात्री संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या प्रमुखांमध्ये सतत फोन सुरू होते.

नरवणे यांनी लिहीलं आहे की, मी संरक्षण मंत्र्यांनी परिस्थितीचं गांभिर्य संमजावून दिलं, त्यांनी सांगितलं की मी तुमच्याशी संपर्क करतो, जो त्यांनी रात्री २२.३० वाजता केला. त्यांनी सांगितलं की पंतप्रधानांशी चर्चा केली आणि त्यांनी जे योग्य वाटेल ते करा, हा पूर्णपणे लष्करी निर्णय होता.

माजी आर्मी चीफ यांनी पुढे लिहीलं की, मला कार्टे ब्लँच सोबत एक गरम बटाटा दिला गेला होता. जबाबदारी आता पूर्णपणे माझ्याकडे होती. मी एक खोल श्वास घेतला आणि काही मिनीटं गुपचूप बसून राहिलो. भींतीवर घड्याळाची टक-टक सोडून सगळं शांत होतं.

general mm narvane on Galwan Valley conflict in  Four Stars of Destiny an Autobiography incident with rajnath singh
Parliament Breach : घुसखोरी प्रकरणानंतर मोठा खुलासा! संसदेत सुरक्षा कर्मचाऱ्यांचं शॉर्टेज; 72 ऐवजी फक्त दहाच ऑफिसर

मी आर्मी हाऊस मध्ये माझ्या घरात होतो, एका भींतीवर जम्मू-काश्मीर आणि लद्दाखचा नकाशा होता, दुसऱ्या भींतीवर इस्टर्न कमांडचा नकाशा होता. या नकाशांवर खुणा केलेल्या नव्हत्या, मात्र मी त्याच्याकडे पाहून प्रत्येक सैन्य यूनिटच्या ठिकाणांची कल्पना करु शकत होतो. आम्ही सर्व प्रकारे तयार होतो, पण मला खरोखर युद्ध सुरू करायचे होते का?

त्यांनी पुढे लिहीलं की हे काही कुठले वॉर गेम नव्हता, जो आर्मी वॉर कॉलेजच्या सँड मॉडेलच्या रुपात खेळला जात होते, तर जीवन आणि मृत्यूची परिस्थिती होती. जागतिक क्षेत्रात आपले समर्थक कोण होते आणि चीन-पाकिस्तानच्या धोक्याचे काय? माझ्या मनात शेकडो वेगवेगळे विचार चमकले?

नरवणे लिहितात की, काही वेळ विचार केल्यानंतर त्यांनी नॉर्दन कामांडर लेफ्टिनंट जनरल वायके जोशी यांना पोन केला . मी त्यांना म्हणालो की, आमच्या बाजूने प्रथम गोळीबार होऊ शकत नाही कारण त्यामुळे चिनी लोकांना पुढे घुसण्याचे निमित्त मिळेल आणि आपल्याला आक्रामक म्हणून दाखवले दाखवण्यासाठी कारण मिळून जाईल.  

तसेच नरवणे यांनी पुढे परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली गेली याबद्दल देखील माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.