विद्यार्थ्यानं स्टेजवरुन दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा; कॉलेजने प्राध्यापिकेलाच केलं निलंबित

Ghaziabad: या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्राध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे.
ghaziabad abes college suspend teacher on jai shree ram slogan controversy viral video
ghaziabad abes college suspend teacher on jai shree ram slogan controversy viral video Sakal
Updated on

Ghaziabad: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका खासगी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. यामुळे तेथे उपस्थित महिला प्राध्यापिकेने विद्यार्थ्याला स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.

ABES कॉलेज गाझियाबादचे संचालक संजय कुमार सिंह यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की, 'एक व्हिडिओ समोर आला होता. तो व्हिडिओ आल्यानंतर आम्ही उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली.

या समितीला 24 तासांच्या आत शिफारशी देण्याच्या सूचना कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. समितीच्या शिफारशींच्या आधारे दोन प्राध्यापकांचे वर्तन अयोग्य असल्याचे आढळून आल्याने त्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे.

Ghaziabad Professor Asks Student To Leave Stage For Chanting ‘Jai Shri Ram’ At Cultural Fest
Ghaziabad Professor Asks Student To Leave Stage For Chanting ‘Jai Shri Ram’ At Cultural Fest Sakal
ghaziabad abes college suspend teacher on jai shree ram slogan controversy viral video
Rajasthan Elections: राजस्थानसाठी काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; गेहलोत, पायलट, वसुंधरा राजेंचा मतदारसंघ ठरला

काय आहे संपूर्ण प्रकरण?

शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ गाझियाबादच्या एबीईएस कॉलेजचा आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने मंचावरून 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या. प्राध्यापिकेने विद्यार्थ्याला स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितले आणि त्याला असे करण्यापासून रोखले. ही घोषणाबाजीची जागा नाही, असे प्राध्यापिकेने सांगितले होते.

ghaziabad abes college suspend teacher on jai shree ram slogan controversy viral video
Indra Mani Pandey: पहिल्यांदाच एका भारतीय अधिकाऱ्याला मिळाली 'बिमस्टेक'च्या सरचिटणीस पदाची जबाबदारी

पोलिसांच्या कारवाईनंतर कॉलेजची कारवाई

सोशल मीडियावर अनेकांनी यावर कारवाईची मागणी केली होती. गाझियाबाद पोलीस आयुक्तालयाने ट्विटरवर लिहिले की, "स्टेशन प्रभारी यांना तपास करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत." आता याप्रकरणी कॉलेज प्रशासनाने दोन प्राध्यापकांना निलंबित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()