Crime News : 13 वर्षाच्या मुलाचा 6 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच डोक्यात घातली वीट

हत्येनंतर मुलीचं रक्त वाहून गेल्यावर, मुलानं जवळच्या टाकीत हात धुतले, रक्तानं माखलेला शर्ट बदलला आणि तो शाळेत गेला, असं पोलिसांनी सांगितलं.
Ghaziabad Crime News
Ghaziabad Crime Newsesakal
Updated on
Summary

ही चिमुरडी शनिवारी सकाळी तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असताना बेपत्ता झाली. नंतर ती मोदीनगर गावातील घरामागील झुडपात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली.

Ghaziabad Crime News : गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका 13 वर्षांच्या मुलानं बलात्काराच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळं 6 वर्षाच्या चिमुरडीच्या (Minor Girl) डोक्यात वीट घालून तिला ठार केलं.

हत्येनंतर मुलीचं रक्त वाहून गेल्यावर, मुलानं जवळच्या टाकीत हात धुतले, रक्तानं माखलेला शर्ट बदलला आणि तो शाळेत गेला, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिमुरडी शनिवारी सकाळी तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असताना बेपत्ता झाली. नंतर ती मोदीनगर गावातील घरामागील झुडपात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. मुलीच्या पालकांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथं पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आलं.

Ghaziabad Crime News
'ती' तुम्हाला 3 हजार देत असेल, तर आम्ही एका मतासाठी 6 हजार देऊ; भाजपच्या बड्या नेत्याची मतदारांना 'ऑफर'

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार गाझियाबादचे डीसीपी (ग्रामीण) रवी कुमार यांनी सांगितलं की, एका गावकऱ्यानं फोन करून आम्हाला याची माहिती दिली. गावकऱ्यानं एक मुलगी आमच्या घराच्या मागील अंगणात जखमी अवस्थेत पडली आहे, असं सांगितलं. त्यानंतर पोलिस तिथं पोहोचेपर्यंत मुलीच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेलं होतं. इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिचा चेहरा, डोकं विटेनं ठेचण्यात आलं होतं. या चिमुरडीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी 7 पथकं तयार केली आहेत.

Ghaziabad Crime News
Deepak Kesarkar : 'एक दिवस मला पंतप्रधान करा, 370 कलम रद्द करतो..'; असं का म्हणाले केसकर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.