Ghaziabad Railway : रेल्वे रुळावर रिल्स बनवनं पडलं महागात; एक्स्प्रेसच्या धडकेत मुलीसह तिघांचा मृत्यू

पद्मावत एक्स्प्रेसच्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला आहे.
Railway Track in Ghaziabad
Railway Track in Ghaziabadesakal
Updated on
Summary

पद्मावत एक्स्प्रेसच्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला आहे.

गाझियाबाद : गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन हद्दीत कल्लू गढी रेल्वे रुळावर उभं राहून रिल्स (Reels) बनवत असलेल्या तरुणीचा आणि दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

देहात झोनचे डीसीपी डॉ. इराज राजा यांनी सांगितलं की, कल्लू गढी रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी आणि दोन तरुण रिल्स बनवत असल्याची माहिती स्टेशन मास्टरकडून मिळाली होती. त्यानंतर पद्मावत एक्स्प्रेसच्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून तिघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Railway Track in Ghaziabad
Supriya Sule : 'या' कारणासाठी सुप्रिया सुळेंनी मानले अमित शाहांचे आभार; म्हणाल्या, त्यांनी आम्हाला..

तरुणीचं वय 22 ते 25 च्या आसपास असून दोन्ही तरुणांचं वय 30 ते 35 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या मृतांची ओळख पटली नाही. डीसीपी राजा यांनी सांगितलं की, 'ही रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घडली. रेल्वे स्टेशन मास्टरनं आम्हाला याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ आम्ही तिथं दाखल झाला. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. आम्हाला रेल्वेकडून माहिती मिळाली की, हे तिघं तिथं व्हिडीओ बनवत होते.'

Railway Track in Ghaziabad
Udayanraje Bhosale : मूठभर लोकांच्या हातात 'रयत'ची सत्ता; उदयनराजेंचा शरद पवारांवर रोख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.