Narendra Modi : गुलाम नबी आझाद मोदींवर बोलले; 'त्यांनी सूडाच्या भावनेतून...'

gulam nabi aazad on pm narendra modi
gulam nabi aazad on pm narendra modiesakal
Updated on

नवी दिल्लीः राज्यसभेचे माजी खासदार तथा पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. त्यामुळे सर्वच जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

आझाद म्हणाले की, नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत कधीच सूडाच्या भावनेतून काम केलं नाही. संसदेत विरोधी पक्षात असल्यामुळे मी अनेकदा भाजपविरोधात बोललो मात्र पंतप्रधानांनी केवळ राजकीय नेत्यासारखे व्यवहार ठेवले.

हेही वाचाः शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

गुलाम नबी आझाद पुढे म्हणाले की, मी त्यांच्यासोबत जे काम करु शकलो, त्याचं श्रेय मोदींनाच आहे. ते खूपच उदार आहेत. मी कलम ३७० किंवा हिजाबवरुन टीका केली मात्र ते एका प्रगल्भ नेत्याप्रमाणे वागले.

ते पुढे म्हणाले की, जी२३ ला भाजपचा प्रवक्ता म्हणणं चुकीचं आहे. जर असं होतं तर काँग्रेसने त्यांना खासदार का बनवलं. त्यांना खासदार, महासचिव आणि पदाधिकारी का केलं? मी एकटा आहे ज्याने स्वतःचा पक्ष काढला. बाकीचे अजून तिथेच आहेत. त्यामुळे हा आरोप दुर्दैवी असल्याचं आझाद म्हणाले.

gulam nabi aazad on pm narendra modi
Mango News : पुण्यात आता हप्त्यावर आंबा; बारा महिन्यांचा EMI करा अन् आंब्याची पेटी घेऊन जा!

गुलाम नबी आझाद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, नेहरू, राजीव आणि इंदिरा हे धक्का सहन करू शकत होते. त्यांच्यात संयम होता. त्यांना जनतेचा पाठिंबा होता, जनतेने त्यांचा आदर केला. कालांतराने ते आपल्या कामाच्या जोरावर पुनरागमन करू शकत होते. मात्र आता तशी शक्यता नाही.

दरम्यान, मला काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे पर्दाफाश आणि उच्चाटन करायचे नाही. माझ्या नेतृत्वाशी काही मतभेद आहेत, पण काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस विचारधारेशी माझे कोणतेही मतभेद नाहीत, असंही आझाद म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.